दाभोळ-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त
दाभोळ-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

दाभोळ-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

sakal_logo
By

मुरुडमधील बीएसएनएल सेवा सुरळीत
दाभोळ ः दापोली तालुक्यातील मुरुड येथील बीएसएनएल कंपनीची मोबाईल सेवा गेले काही दिवसांपासून ठप्प झाली होती. मात्र आता ही सेवा सुरळीत झाल्याने मोबाइल सेवाधारकांनी समाधान व्यक्त केले आहे. मुरुड हे दापोली तालुक्यातील महत्वाचे पर्यटन केंद्र असून या ठिकाणी असलेली बीएसएनएलची मोबाईल सेवा अनेकवेळा विविध कारणांनी खंडित होते. या सेवेवर अवलंबून असणाऱ्या ग्राहकांची अनेक कामे यामुळे अपूर्ण राहतात. सध्याच्या काळात डीजीटल व्यवहार मोठ्या संख्येने होत असल्याने अनेक पर्यटक रोखीतील व्यवहार कमी करतात, मात्र मोबाईल रेंज अनेकवेळा नसल्याने हे व्यवहार करता येत नसल्याने त्याचा परिणाम खरेदीवर होत असल्याने मोबाईल सेवेत सातत्य असावे अशी मागणी मुरुडमधून करण्यात आली आहे.


महिला सक्षमीकरणासाठी जनजागृती मेळावा
दाभोळ ः महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद शिवकन्या ग्रामसंघ (आतगाव, उंबरशेत, उटंबर) यांच्यातर्फे महिलांचे हक्क, कर्तव्ये व महिला सक्षमीकरणाविषयी जनजागृती करण्यासाठी महिला मेळावा उमेश पाटील व अरविंद जाधव यांच्या प्रांगणात झाला. मेळाव्याला 14 बचत गटातील पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. विविध स्पर्धाचे आयोजन कण्यात आले होते. यामध्ये पाचवी ते सातवीच्या मुलींसाठी आदर्श स्त्री व राजमाता जिजाऊ, आठवी ते अकरावीच्या मुलींसाठी स्त्रीमुक्ती वास्तव की आभास व 21 व्या शतकातील स्त्री, या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्यांना पारितोषिक देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाला सरपंच सौ. तन्वी रेवाळे, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, आरोग्य विभागातील महिला कर्मचारी, बचत गटाच्या अस्मिता पाटील, कृषी सखी सौ. उर्मिला पाटील, सचिव सौ. अनुष्का माने आदी उपस्थित होत्या.
----------

दापोलीचे मच्छीमार्केट
इमारत उदघाटनाच्या प्रतिक्षेत
दाभोळ ः दापोली नगरपंचायतीमार्फत बांधण्यात आलेली मच्छीमार्केटची नवीन अद्ययावत इमारत शुभारंभाच्या प्रतिक्षेत आहे. भाजी विक्रेते, फळविक्रेते, चिकन, मासे व मटनमार्केट या एकाच इमारतीत उभारण्यात आले असून एक वर्षापूर्वीच ही इमारत बांधून पूर्ण झाली आहे. मात्र त्याचे उदघाटन अद्याप झाले नसल्याने तिचा वापर सुरू झालेला नाही. सध्या दापोली मच्छीमार्केटकडे जाणारा रस्ता अरुंद आहे. जर या इमारतीमध्ये लगतचे सर्व भाजी विक्रेते, चिकन सेंटर तसेच मासे विक्रेते गेले तर हा रस्ता मोकळा होणार असून दापोलीत येणाऱ्या पर्यटकांना व दापोलीकरांना एकाच छताखाली सर्व वस्तूंची खरेदी करता येणार आहे. लवकरच या वस्तूचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष सौ. ममता मोरे यांनी दिली.
--------------