हर्णै -कासवाची 200 पिल्ले विसावली समुद्रात

हर्णै -कासवाची 200 पिल्ले विसावली समुद्रात

फोटो ओळी
-rat१९p९.jpg ः3L90052 हर्णै ः मुरूड समुद्र किनाऱ्यावर गेल्या पाच दिवसात एकूण २०० पिल्ले समुद्रात सोडण्यात आली.
-rat१९p१०.jpg ः KOP23L90028 मुरूड समुद्रकिनारी अशाप्रकारे कासवांची घरटी संरक्षित केली आहेत.
-rat१९p११.jpg ः KOP23L90029 येथील जीवरक्षक राजेश शिगवण यांनी शनिवारी (ता. १८) या दिवशी ८१ पिल्ले समुद्रात सोडली.
-----------

कासवाची २०० पिल्ले विसावली समुद्रात
मुरुड किनारा ; २५ घरट्यांत तीन हजार अड्यांचे संरक्षण
हर्णै, ता. १९ ः ऑलिव्ह रिडले जातीच्या समुद्री कासवांची दापोली तालुक्यातील मुरूड येथील समुद्रकिनार्‍यावर एकूण २५ घरटी संरक्षित केली असून गेल्या पाच दिवसात २०० कासवांच्या पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले, अशी माहिती मुरूड येथील जीवरक्षक राजेश शिगवण यांनी ''सकाळ''शी बोलताना दिली.
साधारण ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत बऱ्याचदा ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची घरटी समुद्रकिनार्‍यांवर आढळून येतात. समुद्र कासवांची जात संरक्षित व्हावी यासाठी वनविभाग, सह्याद्री प्रतिष्ठान चिपळूण व स्थानिक कासवमित्र मेहनत घेत आहेत. कासवांच्या अंड्यांना प्राणी व माणसापासून धोका असतो. त्यामुळे समुद्रकिनाऱ्याजवळील कासवमित्रांच्या मदतीने जाळे लावून अंड्यांना जमिनीत खड्ड्यात ठेवून संरक्षित केले जाते. त्यानंतर ६० ते ७० दिवसांच्या कालावधीत या अंड्यातून पिल्ले बाहेर येतात, असे येथील जीवरक्षकांकडून सांगण्यात आले.
मुरूड येथे सापडलेल्या कासवांच्या अंड्यांचे संरक्षण सध्या वनविभाग अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली येथील कासवमित्र आणि जीवरक्षक राजेश शिगवण व शाम माने हे करत आहेत. यावर्षी मुरूड येथील समुद्र किनाऱ्यावर साधारणतः डिसेंबर ते मार्चपर्यंत या कासवांची एकूण २५ घरटी सापडून आली आहेत. प्रत्येक घरट्यामध्ये किमान १०० ते १२० अंडी आहेत, अशी माहिती शिगवण यांनी दिली. या सर्वच घरट्यांना जाळी लावून संरक्षित करण्यात आले आहे. या अंड्यातून पिल्ले बाहेर आल्यानंतर त्यांना समुद्राच्या पाण्यात सोडण्यात येते. गेल्या पाच दिवसात एकूण २०० कासवांची पिल्ले समुद्रात सोडली आहेत. मे महिन्याच्या अखेरपर्यंत साधारण सुमारे २५०० ते ३ हजार पिल्ले मुरूड समुद्र किनाऱ्यावरून समुद्रात सोडली जातील, असे शिगवण यांनी सांगितले. ही कासवांची पिल्ले समुद्रात सोडताना मुरूड परिसरातील ग्रा. पं. सदस्य रंजन पुसाळकर, संदेश घाग, साहिल तुपे, धीरज उर्फ बबलू बागकर, शाम माने आदी कासवमित्र उपस्थित होते. सध्या आंजर्ले येथे ३० मार्चपर्यंत कासव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com