
रत्नागिरी- आविष्कारच्या स्नेहसंमेलनात अनोखा कलाविष्कार
-rat१९p२८.jpg- KOP२३L९००६०
रत्नागिरी : स्वा. सावरकर नाट्यगृहात शनिवारी आविष्कार संस्थेच्या स्नेहसंमेलनात प्रभू श्रीरामचंद्र, लक्ष्मण, सीतेच्या वेशभूषेत विद्यार्थी पहिल्या छायाचित्रात तर दुसऱ्या छायाचित्रात घे भरारी- मुलगी शिकवा या गीतावर नृत्य करणारे विद्यार्थी.
(मकरंद पटवर्धन : सकाळ छायाचित्रसेवा)
आविष्कारच्या स्नेहसंमेलनात अनोखा कलाविष्कार
उद्योजक मलुष्टे यांनी दिली २५ हजारांची देणगी,
रत्नागिरी, ता. २० : आविष्कार संस्थेचे कार्य देवाचे कार्य आहे आणि हे काम करणारे संस्थेतील शिक्षक, कर्मचारी हे देवदूत आहेत. याला दुसरी काही उपमा देऊ शकत नाही. हिमालयाएवढ्या कार्याला माझाही खारीचा वाटा देत असून संस्थेकरिता २५ हजार रुपयांची देणगी उद्योजक राजन मलुष्टे यांनी जाहीर केली.
आविष्कार संस्थेच्या सौ. सविता कामत विद्यामंदिर आणि शामराव भिडे कार्यशाळेतील विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवारी (ता. १८) स्वा. सावरकर नाट्यगृहात झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर राधिका मलुष्टे, संस्थाध्यक्ष बिपीन शाह, सचिव संपदा जोशी, कोषाध्यक्ष डॉ. शरद प्रभुदेसाई उपस्थित होते. या वेळी मलुष्टे यांचा सन्मान विद्यार्थ्यांनी बनवलेल्या आकर्षक पुष्पगुच्छाने अध्यक्ष शाह यांनी केला.
विद्यार्थ्यांनी सुरेख कार्यक्रम सादर करून चुणूक दाखवून दिली. गुढीपाडव्यापासून श्रावणातील सण, गणपती, दिवाळी, शिमगोत्सव या सणांवर नृत्य सादरीकरण केले. फ्युजन डान्सने मने जिंकली. घे भरारी - मुलीला शिकवा हा अनोखा नृत्याविष्कार विद्यार्थ्यांनी सादर केला. मुलीच्या जन्माचे स्वागत करा, तिला शिकवा, ती यशस्वी होईल, उच्च शिक्षण घेईल, असा संदेश यातून देण्यात आला.
गण बाई मोगरा या गीतावर पोटॅटो डान्सने तर सर्व प्रेक्षकांना डोलायला लावले. ए मेरे वतन के लोगो या देशभक्तीपर गीताने सैनिकांप्रती आदर आणि त्यांचे देशासाठी योगदान यावर प्रकाशझोत टाकला. ढोलकीच्या तालावर ही लावणी विद्यार्थ्यांनी गायली व त्याला वाद्यसाथ विद्यार्थ्यांनीच केली आणि नृत्य देखील मुलांनीच केले. हा कार्यक्रमही अप्रतिम झाला.मुख्याध्यापिका वैशाली जोशी यांनी शाळेची माहिती सांगितले. सचिन चव्हाण यांनी कार्यशाळेच्या उपक्रमांची माहिती दिली. शामराव भिडे कार्यशाळेचे व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वायंगणकर यांनी आभार मानले.
चौकट १
विश्रांतीदेवी शेरे स्मृती पुरस्कारांचे वितरण
आविष्कार संस्थेत विश्रांतीदेवी शेरे स्मृती पुरस्कारांचे वितरण प्रमख पाहुणे राजन मलष्टे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यंदाचा गुणवंत शिक्षक पुरस्कार सौ. ज्योती पवार आणि गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार करीना कृष्णा गवाणकर यांना दिला.