कोंढेतडच्या ठाकूर उद्यानाची दुरवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोंढेतडच्या ठाकूर उद्यानाची दुरवस्था
कोंढेतडच्या ठाकूर उद्यानाची दुरवस्था

कोंढेतडच्या ठाकूर उद्यानाची दुरवस्था

sakal_logo
By

rat१९१५.txt

- rat१९p१४.jpg ः
९००३२
राजापूर ः तुटलेले लाईट बोर्ड.
- rat१९p१५.jpg ः
९००३३
पडलेली कंपाऊंड वॉल.
- rat१९p१६.jpg ः
९००३४
साचलेला पालापाचोळा, तुटलेली खेळणी
- rat१९p१७.jpg ः
९००३५
तुटलेली खेळणी
-

कोंढेतडच्या ठाकूर उद्यानाची दुरवस्था

खेळणी, बैठका तुटक्या अवस्थेत ; नागरिकांची नाराजी, पालिकेचे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २० ः शहरातील कोंढेतड येथील महंमदसो ठाकूर उद्यानाची पार दुरवस्था झाली आहे. या उद्यानातील खेळणी, बैठका तुटल्या असून सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. उद्यानाच्या झालेल्या दुरवस्थेमुळे नागरिकांनीही या उद्यानाकडे पाठ फिरवली असून त्यातून शासनाचे लाखो रुपयांचा खर्च वाया गेला आहे. या उद्यानाची नगर पालिकेने तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष आजिम जैतापकर यांनी केली आहे.
शहरातील अबालवृद्ध नागरिकांना विरंगुळा म्हणून फेरफटका मारता यावा, निवांत बसता यावं याकरिता शहरात ठिकठिकाणी लाखो रुपये खर्च करून उद्याने उभारण्यात आली आहेत. यामध्ये रानतळे येथील पिकनिक स्पॉट, चव्हाणवाडी येथील (कै.) भिकाजीराव चव्हाण उद्यान, कोंढेतड येथील महंमदसो ठाकूर उद्यान या प्रमुख उद्यानांचा समावेश आहे. मात्र, गेली काही वर्षे डागडुजीअभावी या उद्यानांची दुरवस्था झाली आहे. स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत रानतळे पिकनिक स्पॉटचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. मात्र, महंमदसो ठाकूर उद्यानाची सद्यःस्थितीत पार दुरवस्था झाल्याचे दिसत आहे. या उद्यानाच्या प्रवेशद्वारावरील लोखंडी गेट तुटला असून नागरिकांना बसण्यासाठी बसवण्यात आलेली बैठक व्यवस्था आणि मुलांना खेळण्यासाठी बसवलेली खेळणी तुटल्या स्थितीमध्ये आहेत. उद्यानात सर्वत्र पालापाचोळा आणि कचरा साचला आहे. उद्यानातील लाईटव्यवस्था तुटली असून स्वच्छतागृहाचीही दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या उद्यानाकडे कोणीही फिरकत नसून हे उद्यान विनावापर पडून आहे.

सुशोभिकरण करा...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष आणि कोंढेतड येथील ग्रामस्थ जैतापकर यांनी उद्यानाच्या या दुरवस्थेकडे लक्ष वेधले असून या उद्यानाचे पालिकेने तातडीने सुशोभीकरण करावे, अशी मागणी केली आहे.