मुंबई-गोवा महामार्ग परिसरातील वन्य प्राण्यांच्या अधिवासांचे सर्वेक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई-गोवा महामार्ग परिसरातील
वन्य प्राण्यांच्या अधिवासांचे सर्वेक्षण
मुंबई-गोवा महामार्ग परिसरातील वन्य प्राण्यांच्या अधिवासांचे सर्वेक्षण

मुंबई-गोवा महामार्ग परिसरातील वन्य प्राण्यांच्या अधिवासांचे सर्वेक्षण

sakal_logo
By

पान 5 साठी


मुंबई-गोवा महामार्ग परिसरातील
वन्य प्राण्यांच्या अधिवासांचे सर्वेक्षण
रत्नागिरी, ता. १९ ः समृद्धी महामार्गावर वन्य प्राण्यांच्या समस्या उद्‍भवल्यानंतऱ आता मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केल्या आहेत.
महामार्गाच्या निर्मितीच्या कामांना वेग येत असताना यात वन्यजीवांच्या मार्गांवर अतिक्रमण केले जात असल्याची ओरड होत आहे. वन्यजीवांचे मार्ग निश्चित करून त्यांना भुयारी मार्ग किंवा उड्डाणमार्ग तयार करण्याची गरज आहे. त्यासाठी वन्यजीवांच्या अपघातांच्या जागा निश्चित करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आता या मार्गावर सावधगिरी म्हणून वन्यप्राण्यांच्या बाधित अधिवासाचा अभ्यास सुरू केला आहे.
महामार्गावरून भरधाव जाणारी वाहने आणि हॉर्नच्या आवाजाने प्राणी बुजतात. त्यामुळेही अपघात होण्याचा धोका असतो. त्याचाही विचार करून पुलाखाली व भुयारात ध्वनिरोधक यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यापुढे कोणत्याही भागात रस्ता, महामार्ग किंवा पूल बांधायचा झाल्यास आणि आजूबाजूला जंगल असेल, तर सर्वांत आधी वन्यजीवांच्या येण्या-जाण्याचा मार्ग सुरक्षित करण्यावर प्राधान्य देण्यात येणार आहे. ज्या भागात वन्यजीवांचे नैसर्गिक मार्ग आहेत त्या भागातून महामार्ग उभारला जात असताना वन्यजीवांचे मार्ग बंद होतात. अशावेळी वन्यजीवांचा अपघातात मृत्यू झाल्याच्या घटना समोर येतात. वन्यजीवांचे अपघात होत असलेल्या ठिकाणी रस्ते रंदीकरण करत असताना त्यांना विनाअडथळा प्रवास करता यावा यासाठी पर्यायी मार्ग उभारण्याची गरज आहे. समृद्धी महामार्गात असा प्रयोग करण्यात आला. मात्र, इतर ठिकाणी तसे प्रयोग अजूनही झालेले नाही. वन्यजीवांच्या अपघाताची नोंद होत नसल्याने त्यांचे मार्ग बंद होऊन त्यांचे भविष्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे वन्यजीवांच्या मार्गांचा आणि अपघात स्थळांचा अभ्यास करण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.