
निगुडे येथे ग्रामपंचायतीतर्फे महिलांना व्यवसाय प्रशिक्षण
90137
निगुडे ः येथे प्रशिक्षणात सहभागी झालेल्या महिलांसह मान्यवर.
निगुडे येथे ग्रामपंचायतीतर्फे
महिलांना व्यवसाय प्रशिक्षण
बांदा, ता. १९ ः निगुडे ग्रामपंचायत येथे १५व्या वित्त आयोगामार्फत महिलांना व्यवसाय प्रशिक्षण कोल्हापूर संस्थेमार्फत देण्यात आले. यावेळी कोल्हापूर व्यवसाय प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय देसाई, प्रशिक्षणार्थी प्रकाश पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन तेले.
भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. गावात तीन ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रम झाला. यामध्ये ५० महिलांनी प्रशिक्षण घेतले. संजय देसाई यांनी, कोणताही व्यवसाय किंवा त्याचे प्रशिक्षण घेत असताना त्यात गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. येथील महिलांनी प्रशिक्षण घेतल्यानंतर रात्री दोनपर्यंत जागून कापडी पिशव्या बनवल्या. ही बाब कौतुकास्पद आहे. या व्यवसाय प्रशिक्षणातून महिला वर्गाला एक नवी ऊर्जा मिळाल्याचे पाहून भारावून गेलो, असे सांगितले. निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर यांनी महिलांनी सक्षम होण्यासाठी व्यवसाय उद्योगांत यशस्वी होणे गरजेचे असल्याचे सांगितले. यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सहकार्याचे आश्वासन त्यांनी दिले. या प्रशिक्षणातून महिलांसाठी ग्रामपंचायतीच्या निधीचा पुरेपूर उपयोग झाल्याचे ते म्हणाले. माजी सरपंच समीर गावडे, माजी उपसरपंच गुरुदास गवंडे, ग्रामपंचायत सदस्य साक्षी गावडे यांनी आपले व्यक्त केले. शमिता नाईक, माजी ग्रामपंचायत सदस्य ईशा तुळसकर, विषया गवंडे, सीआरपी संजना केसरकर, संजना गावडे आदी उपस्थित होते. आशा सेविका भाग्यलक्ष्मी मोरजकर यांनी सूत्रसंचालन केले. ग्रामपंचायत सदस्य साक्षी गावडे यांनी आभार मानले.