खेड-खेड शहराला पोलिस छावणीचे स्वरूप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-खेड शहराला पोलिस छावणीचे स्वरूप
खेड-खेड शहराला पोलिस छावणीचे स्वरूप

खेड-खेड शहराला पोलिस छावणीचे स्वरूप

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat१९p४०.jpg- खेड ः शहरातील चौकाचौकात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.


खेड शहराला पोलिस छावणीचे स्वरूप

खेड, ता. १९ : येथील गोळीबार मैदानात होणाऱ्या शिवसेनेच्या एल्गार सभेला प्रचंड गर्दी होती. या सभेद्वारे शक्तीप्रदर्शन करण्यात माजी मंत्री रामदास यांच्यासह आमदार योगेश कदम यशस्वी ठरले. या सभेसाठी पोलीसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे खेड शहराला पोलिस छावणीचे स्वरूप आले.
खेड येथे शिवसेनेच्या निष्ठावंताच्या मेळाव्याला संपूर्ण दापोली विधानसभा मतदारसंघातील भगवा झंझावात पाहायला मिळाला. मेळाव्यासाठी शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी मेहनत घेतली. ढोल-ताशांच्या गजरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे लोंढेच्या लोंढे मैदानात दाखल झाले. त्यामुळे खेडसह संपूर्ण गोळीबार मैदान भगवेमय झाले होते. खेड शहराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमुळे सुरक्षेसाठी रायगड आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सभेमुळे शहराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. यामध्ये ३३ अधिकारी, ३९० पोलिस अंमलदार आणि दंगा नियंत्रण पथकाचे ९० जवान सुरक्षा बजावत आहेत. पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधीक्षक सौ. जयश्री गायकवाड यांनी ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.