खेड-ढोल, ताशा, झांज पथकाने खेडमधील रस्ते दणदणले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-ढोल, ताशा, झांज पथकाने खेडमधील रस्ते दणदणले
खेड-ढोल, ताशा, झांज पथकाने खेडमधील रस्ते दणदणले

खेड-ढोल, ताशा, झांज पथकाने खेडमधील रस्ते दणदणले

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat१९p४१.jpg- KOP२३L९०१४४ खेड ः जाहीर सभेसाठी भरणे येथील हेलिपॅडवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन झाल्यावर त्याचे स्वागत करताना पालकमंत्री उदय सामंत, आमदार योगेश कदम.

ढोल, ताशा, झांज पथकाने खेडमधील रस्ते दणदणले
खेड : ढोल, ताशा अन झांजांच्या गजराने खेडमधील रस्ते दणाणून गेले. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी हजारो शिवसैनिक गोळीबार मैदानावर आले होते. भगवे झेंडे, भगव्या फेट्यांमुळे संपूर्ण खेड शहर भगवे झाले होते.
या सभेसाठी खेड, दापोली, मंडणगड तालुक्यातून लाखो शिवसैनिक गाड्या भरभरून आले होते. एसटी, जीप, टेम्पो यातून हे शिवसैनिक सभास्थळी येत होते. खेडमधील गोळीबार मैदानावर झालेल्या या सभेसाठी ८० फूट लांब आणि ३० फूट रुंद तसेच ५ फूट उंच असे भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते. व्यासपीठावर शिवसेनेचे सर्व नेते, आजी माजी आमदार खासदार उपस्थित होते. खेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन झाल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत, आमदार योगेश कद, माजी आमदार सदानंद कदम यांनी त्यांचे स्वागत केले.