Sat, June 10, 2023

संगमेश्वर-संगमेश्वरला मंगळवारी देवी जाखमातेचा शिंपणे उत्सव
संगमेश्वर-संगमेश्वरला मंगळवारी देवी जाखमातेचा शिंपणे उत्सव
Published on : 19 March 2023, 2:58 am
संगमेश्वरला उद्या देवी जाखमातेचा शिंपणे उत्सव
संगमेश्वर, ता. १९ ः महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारा संगमेश्वर येथील देवी जाखमाता आणि निनावी देवीचा शिंपणे म्हणजेच रंगपंचमी उत्सव संगमेश्वर तालुक्यात मंगळवारी (ता. २१) संगमेश्वरसह, कसबा, माखजन आणि देवरूख येथे साजरा केला जाणार आहे. या उत्सवाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. कसबा, माखजन आणि कडवई येथे मंदिरे सजविण्यात आली आहेत. या उत्सवात लाल रंगाची दिवसभर उधळण करून भाविक देवीला रखवालीचे आणि नवसाचे जे नारळ, कोंबडे आणि बोकड अर्पण करतात त्याचा प्रसाद करुन रात्री मटण भाकरीच्या प्रसादाने या उत्सवाची सांगता होते. या उत्सवात निघणारे रंगाचे फेरे हा येणाऱ्या भक्तगणांसाठी खास आकर्षणाचा विषय ठरतो.