‘कौशल्य विकास’अंतर्गत आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘कौशल्य विकास’अंतर्गत आवाहन
‘कौशल्य विकास’अंतर्गत आवाहन

‘कौशल्य विकास’अंतर्गत आवाहन

sakal_logo
By

‘कौशल्य विकास’अंतर्गत आवाहन
सिंधुदुर्गनगरी ः जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२२-२३ साठी स्किल इंडिया पोर्टल व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मुंबई यांच्याकडे सूचीबद्ध असलेल्या संस्थांमार्फत मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी तत्काळ प्रशिक्षण संस्थेकडे संपर्क करून नावनोंदणी करावी किंवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांनी केले आहे.
................
मालवणातील पथदीप दिवसाही सुरूच
मालवण ः शहरात व वायरी ग्रामपंचायत हद्दीत गेले कित्येक दिवस दिवसाढवळ्या पथदीप सुरू आहेत. याकडे संबंधित विभागाने वेळीच लक्ष देऊन दिवसा सुरू राहणारे पथदीप बंद करावेत, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. शहरातील काही प्रभागांत तसेच वायरी ग्रामपंचायत हद्दीतील गर्देरोड ते दांडी परिसरात गेले बरेच दिवस भरदिवसा पथदीप सुरू असल्याचे नागरिकांनी सांगितले. यामुळे विजेचा अपव्यय होत आहे. वाढत्या वीजबिलांमुळे महावितरणसमोर थकित वीजबिल वसुलीचे आव्हान असताना पथदीप दिवसाढवळ्या सुरू ठेवल्यामुळे महावितरणचे याकडे दुर्लक्ष होत आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करून दिवसा सुरू असलेले पथदीप बंद करण्याची मागणी होत आहे.
..................
शिक्षकांमुळे आजीला मिळाली ‘सावली’
मालवण ः कट्टा (ता.मालवण) येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जोपासत वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला. कट्टा बाजारपेठेत भाजी विक्रीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या आजींना सावलीसाठी मोठी छत्री देऊन त्यांना मदतीचा हात दिला. शिक्षकांच्या या समाजाभिमुख कार्याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.