भिरवंडेत उद्या ‘होम मिनिस्टर’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिरवंडेत उद्या ‘होम मिनिस्टर’
भिरवंडेत उद्या ‘होम मिनिस्टर’

भिरवंडेत उद्या ‘होम मिनिस्टर’

sakal_logo
By

भिरवंडेत उद्या ‘होम मिनिस्टर’
कनेडी ः हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या दिवशी बुधवारी (ता.२२) ‘स्मार्ट सुनबाई खेळ पैठणी’चा स्पर्धा आयोजित केली आहे. भिरवंडे येथील श्रीदेव रामेश्वर मंदिर देवालय संचालक मंडळाच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे होणाऱ्या ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना भेटवस्तू आणि पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. ही स्पर्धा भिरवंडे गाव मर्यादित असून यात सहभाग घेण्यासाठी आपली नावे संदीप सावंत (दुकानदार) यांच्याकडे उद्या (ता. २१) पर्यंत नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. नाव नोंदणी आवश्यक आहे. ऐनवेळी कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही.