भिरवंडे ग्रामपंचायतीत भरली प्राथमिक मुलांची शाळा

भिरवंडे ग्रामपंचायतीत भरली प्राथमिक मुलांची शाळा

90229
भिरवंडे ः येथील ग्रामपंचायत सभागृहात प्राथमिक शाळेतील मुलांना गावातील निवृत्त शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

भिरवंडे ग्रामपंचायतीत भरली प्राथमिक मुलांची शाळा

जिल्ह्यातील पहिला उपक्रम; शिक्षक रजेवर, निवृत्त शिक्षकांचे मार्गदर्शन

कनेडी,ता. २० ः राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू केला असून त्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे शिक्षक सहभागी झाल्याने १४ मार्चपासून शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या उद्देशाने भिरवंडे ग्रामपंचायत ने पुढाकार घेत. ग्रामपंचायतच्या सभागृहात आज प्राथमिक शाळेतील मुलांचा वर्ग भरविला. या शाळेमध्ये शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ ग्रामस्थ, निवृत्त शिक्षक आणि मुंबईकर पालक मार्गदर्शन करत आहेत. ही शाळा शिक्षकांचा संप मिटेपर्यंत सुरू राहणार आहे असल्याचे भिरवंडे सरपंच नितीन सावंत यांनी सांगितले.
जिल्ह्यात सर्वप्रथम भिरवंडे ग्रामपंचायतीमध्ये शाळा भरविण्याचा हा उपक्रम राबविला आहे. आजपासून भरलेल्या या शाळेमध्ये निवृत्त गटशिक्षणाधिकारी तथा साने गुरुजी कथामालाचे राज्य उपाध्यक्ष मोहन सावंत, मुंबई भांडुप येथे अनेक वर्ष दत्तकृपा क्लासेस चालविणारे मुरडवेवाडी येथील संजय सावंत यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व ग्रामपंचायत सदस्य, निवृत्त शिक्षिका रश्मी सावंत, निवृत्त शिक्षिका प्रमिला सावंत, मनीषा सावंत, पालक साक्षी सावंत यांनी मार्गदर्शन केले.
ग्रामपंचायतीमध्ये भरलेल्या शाळेत ३० पैकी २५ विद्यार्थी उपस्थित होते. या विद्यार्थ्यांना सिंधुदुर्ग बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्याकडून खाऊ तर दिर्बा रामेश्वर दूध डेअरी भिरवंडे यांच्याकडून दुधाचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मंगेश सावंत. देवालये संचालक मंडळाचे पदाधिकारी संदीप सावंत, पालक अरविंद सावंत, संदीप सावंत, राजश्री सावंत, ग्रामपंचायत कर्मचारी विशाल सावंत, ऋषिकेश सावंत, शितल राणे, दिलीप पवार आदी उपस्थित होते.
--
विद्यार्थ्यांसाठी उपक्रम
कोरोना कालावधीमध्ये शाळा बंद राहिल्याने दोन वर्षे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले होते. त्यातच आता शैक्षणिक वर्षाच्या अखेरच्या टप्यात आणि दुसऱ्या सत्रातील अंतिम परीक्षेच्या थोंडावर सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होऊन त्यात शिक्षक सहभागी झाले आहेत. त्यामुळे पाच ते सहा दिवसांपासून मुले घरीच आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, ती शिक्षणापासून, शाळेपासून दूर राहू नयेत या उद्देशाने सिंधुदुर्ग बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत सभागृहात शाळा भरविण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com