सदर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सदर
सदर

सदर

sakal_logo
By

rat२०१२.txt

(१४ मार्च टुडे पान तीन)
-rat२०p८.jpg-
९०२४९
प्रा. संतोष गोणबरे
-
टेक्नोवर्ल्ड--लोगो

सेतू बांधा रे सागरी...

पृथ्वीचा ७२ टक्के भाग समुद्री खाऱ्या पाण्याने व्यापलेला आहे. म्हणजे आपल्याला दळणवळण करायचे झाल्यास पाण्याचा प्रवाह ओलांडून जावे लागते, हे खरेच. हा प्रवाह ओढ्याचा किंवा छोट्याशा नदीचा असेल तर काहीतरी शक्कल लढवून आपण पलीकडे जाऊ, पण विस्तीर्ण जलाशय पसरलेला असेल तर? जहाजे आणि हवाई जहाजे इथे प्रत्येक कामासाठी उपयोगी पडतीलच असे नाही. विमान उडवायचे म्हणजे जास्तीचा खर्च, जहाज हाकायचे म्हणजे तळभाग सखोल हवा किंवा एवढे सगळे उपद्वाप करून मिळणारे आऊउपुट तरी भरघोस हवे. म्हणून मग सागरी सेतू बांधण्याचे प्रयोजन घडते. इथे सागरी सेतू म्हणजे गोड्या किंवा खाऱ्या जलाशयावर वाहतुकीयोग्य रस्ता तयार करणे. आपण भूखंडावर जे काही तंत्रज्ञान वापरून पूल तयार करतो ते पाण्याच्या दृष्टीने उपयोगी आहे का? मुळात पाण्यात खांब उभे कसे करणार? आणि उद्या पाण्याच्या ओढ्याने तो खांबच जर हलला तर? प्रभू रामाने हलत्या पाण्यावर सेतू बांधला, हे जर खरे असेल तर तंत्रविज्ञानाचा कोणता बरं नियम लागू झाला असेल?

--प्रा. संतोष गोणबरे, चिपळूण


खरं तर हलत्या पृष्टभागावर कोणतेच बांधकाम करता येत नाही. त्यासाठी घट्ट आणि भक्कम आधार, ज्याला विज्ञान रिजिड सपोर्ट म्हणते तो असावा लागतो. रामायणातील सेतूचे अवशेष समुद्रतळाच्या भूपृष्ठावर सापडतात. खरं तर पूल बांधणीचा इतिहास खूप जुना आहे. दुसऱ्या शतकात रोमनकालीन वास्तुकला दऱ्यांवर लाकडी ओंढके टाकून रस्ता तयार करण्याएवढी प्रगत झाली होती. इ. स. ११७६ मध्ये लंडनमध्ये पहिल्यांदा दगडी पूल बांधला गेला. याकामी १७७९ मध्ये लोखंड आणि पोलादाचा वापर सुरु झाला. २.७ किमी एवढ्या लांबीचा पहिला समुद्री पूल अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को खाडीवर बांधल्याची नोंद सापडते. सध्या ३५.६७ किमी गझोऊ ब्रीज जगातील सर्वांत लांबीचा म्हणून गणला जातो. जो चीनमध्ये आहे. प्रशांत महासागर, अटलांटिक महासागर, हिन्द महासागर, आर्कटिक महासागर म्हणजे दक्षिणी महासागर असे एकूण ५ महासागर जगात अस्तित्वात आहेत. त्यातील प्रशांत सर्वात मोठा आणि खोल आहे ज्याचे क्षेत्रफळ ६,४१,९६,००० मैल वर्ग एवढे प्रचंड आहे. तर भारत खंड तीन बाजूंनी बंगालची खाडी, हिंद महासागर आणि अरब समुद्र या सागरांनी वेढलेला आहे. ईशान्येकडील भूपेन हजारिका सेतु हा भारतातील सर्वात लांब पूल आहे. आसामच्या लोहिया नदीवर बांधलेल्या या पुलाची लांबी सुमारे ९.१५ किमी असून हा पूल आसाम आणि अरुणाचल प्रदेश राज्यांना एकमेकांशी जोडण्याचे काम करतो. बांद्रा-वरळी सी लिंक हा भारताची आर्थिक राजधानी मुंबईमधील एक आश्चर्य म्हणून ओळखला जातो.
वाहत्या पाण्यात खांब म्हणजे पिलर उभारून पूल बांधण्यापूर्वी सर्वप्रथम पाण्याची खोली, पाण्याच्या प्रवाहाची गती, पाण्याखालील मातीची गुणवत्ता, पुलावरील भार आणि पूल तयार झाल्यानंतर गाड्यांचा भार यावर सखोल संशोधन केले जाते. त्यानंतर बीम किंवा सस्पेन्शन किंवा कमानी यापैकी कोणता पूल बांधायाचा आहे, हे ठरविले जाते. सर्वप्रथम पाया रचण्यासाठी कसून प्लॅन बनविला जातो. पाण्याच्या तळाशी घातलेल्या पायाला पाईल म्हणतात. त्यासाठी कॉफरडॅम तंत्रज्ञान वापरतात. कॉफरडॅम हा एक प्रकारचा गोल किंवा चौकोनी ड्रम असतो आणि तो क्रेनच्या सहाय्याने पाण्याच्या मध्यभागी स्थापित केला जातो. आत शिरलेले पाणी पंपाने बाहेर उपसा करण्यात येते आणि घट्ट जमीन सापडल्यावर तेथे खांब बनविण्यासाठी काँक्रीट ओतले जाते. पाणी खूपच खोल असेल तर या कॉफरडॅमचा वापर न करता स्टीलचे अनेक पाईप्स सलग एकावर एक रचले जातात आणि सिमेंट भरून खांब बनविले जातात, त्याला पिअर म्हणतात. कधीकधी पाईल हॅमरच्या सहाय्याने ठोकून तळाशी बॅटरड म्हणजे इंग्रजीतील उलटा Y बनविला जातो. ह्या सर्व मजबुतीमुळे वरचा ब्रीज डेक त्यावरील वाहनांच्या वजना सह व्यवस्थितरित्या पेलू शकेल, असा बनविता येतो. असा भार पेलण्याचे सूत्र फेडरल नियमानुसार केले जाते. वाहनाच्या एकंदरीत वजनाच्या स्थिर किंवा चल अवस्थेत पुलाची लांबी-रुंदी विचारात घेऊन वजन, W = ५००[LN/(N-१)+१२N+३६] बांधणी केली जाते. यात W- एकंदरीत एका किंवा एकावेळी अनेक वाहनांचे वजन, L – वाहनाच्या दोन चाकांचे भारनियमन अंतर आणि N म्हणजे भारीत संख्या होय.
पूल बांधणे खर्चिक असते, पण दळणवळणाच्या दृष्टीने आवश्यक आणि उपयोगी असते. लष्कराच्या दृष्टीने तर अनेक पुलांची बांधकामे केली जातात. याची दुसरी बाजू अशीही आहे की जेव्हा लष्करी हल्ला होतो तेव्हा पहिल्यांदा जास्तीत जास्त पूल उध्वस्थ केले जातात. कधी-कधी समुद्रात पूल बांधताना तेथील जलनिवास आणि जलचर नष्ट होतात तर कधी मातीची भर टाकून निसर्गाची रचना बदलून जमीन तयार करण्याचा प्रयत्न होतो. हवंय की नको, या व्युहात माणूस स्वत:ला अडकवून घेत नाही; त्यामुळे फक्त मिळालं ह्याच आत्मोन्मेषी मिजाशीत तो मस्त जगण्याचा आनंद घेत राहतो. पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध जे-जे बांधकाम अकृत्रिमरित्या उभं राहतं, त्याचे धोके निसर्ग जेव्हा रौद्ररूप धारण करतो तेव्हा जाणवतात, हे काही नव्याने सांगायला नको.

(लेखक महाविद्यालयाचे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आहेत.)