डॉ. अंजनी औरंगाबादकर यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. अंजनी औरंगाबादकर यांचे निधन
डॉ. अंजनी औरंगाबादकर यांचे निधन

डॉ. अंजनी औरंगाबादकर यांचे निधन

sakal_logo
By

rat2020.txt

बातमी क्र. 20 (टुडे पान 3 साठी)

फोटो ओळी
-rat20p5.jpg-
90237
डॉ. अंजनी औरंगाबादकर
-
डॉ. अंजनी औरंगाबादकर यांचे निधन

रत्नागिरी, ता. 20 : येथील प्रसिद्धी स्त्री रोगतज्ज्ञ व चिंतामणी हॉस्पीटलच्या संचालिका डॉ. अंजनी सुनील औरंगाबादकर (वय 73) यांचे रविवारी (ता. 19) दुपारी कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांचे माहेर पुण्याला. तेथे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी प्रसूतीतज्ज्ञ आणि स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून काही काळ सेवा बजावली. त्यांचा विवाह फिजिशियन डॉ. सुनील औरंगाबादकर यांच्याशी झाला. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात काही काळ वैद्यकीय सेवा दिल्यानंतर त्यांनी चिंतामणी हॉस्पिटल उभे केले. डॉ. अंजनी यांनी येथे पूर्णवेळ रुग्णसेवा केली. अनेक कुटुंबीयांच्या त्या फॅमिली डॉक्टर होत्या. अलीकडे त्यांची प्रकृती अस्वास्थ्यामुळे निवृत्ती घेतली होती. गेले काही दिवस डॉ. अंजनी यांच्यावर कोल्हापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी सायंकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली. अनेकांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा डॉ. चेतन, सून डॉ. तारकेश्वरी, मुलगी डॉ. प्राची सूर्यवंशी, जावई डॉ. योगेश सूर्यवंशी आणि नातवंडे असा परिवार आहे.