सरबत, शीतपेय देतात उन्हापासून थंडावा

सरबत, शीतपेय देतात उन्हापासून थंडावा

rat२०१३.txt

-rat२०p१०.jpg-
९०२५२
राजापूर ः विक्रीसाठी दाखल झालेले मातीचे माठ.
-rat२०p९.jpg-
९०२५३
राजापूर ः उसाच्या रसाचा रगाडा.
-
सरबत, शीतपेय देतात उन्हापासून थंडावा

तापमान वाढले : उसाच्या गाड्यावर गर्दी

राजापूर, ता. २० ः गेली दोन वर्ष सातत्याने राहीलेल्या कोरोना महामारीमध्ये सर्वच व्यवहार आणि अर्थचक्र ठप्प झालेले होते. त्यामध्ये वाढत्या उष्म्मामध्ये ठिकठिकाणी हमखास दिसणारे ऊसाचे रगाडेही दिसत नव्हते. मात्र, सद्यस्थितीमध्ये कोरोना महामारी ठप्प झालेली असून जनजीवन पूर्वपदावर आले आहे. त्यातून ऊसाचे रगाडे पुन्हा एकदा सुरू झाले आहेत. त्यामुळे उसाचा रस काढताना रगाड्यावर होणारा घुंगूराचा नाद पुन्हा एकदा कानावर पडू लागला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमान वाढले आहे. वाढत्या तापमानामध्ये अंगाची काहीली होत असून दुपारी घरातून बाहेर पडणे मुश्किल होत आहे. अशा स्थितीमध्ये सरबतची दुकाने आणि ऊसाचे रगाडे जीवाला गारवा देत आहेत. शरीराला थंडावा देणारी लिंबू, कोकम, आवळा आदी विविध प्रकारची सरबते पिण्यासाठी लोकांची गर्दी झाल्याचे ठिकठिकाणी दिसत आहे. त्याचवेळी घुंगूराचा नाद करणाऱ्‍या ऊसाच्या रगाड्यावरही लोकांची चांगलीच गर्दी दिसते.
-
मातीच्या माठांनाही मागणी

उन्हाळ्यामध्ये थंड पाण्यासाठी मातीच्या माठांनाही मोठ्याप्रमाणात मागणी होवू लागली आहे. त्यातून, बाजारपेठेमध्ये मोठ्याप्रमाणात माठ विक्रीसाठी दाखल झाले आहेत. यामध्ये एक लिटरपासून दीड-दोन लिटरचे माठ साडेचारशे रुपयापासून बाजारात उपलब्ध आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com