आडवलीत गुरुवारपासून विविध कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आडवलीत गुरुवारपासून विविध कार्यक्रम
आडवलीत गुरुवारपासून विविध कार्यक्रम

आडवलीत गुरुवारपासून विविध कार्यक्रम

sakal_logo
By

आडवलीत गुरुवारपासून विविध कार्यक्रम

श्री स्वामी जयंती उत्सव; नृत्य स्पर्धा, दशावतार नाटकाचा समावेश

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २० : तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मठ समर्थगड-आडवली येथे गुरुवार (ता. २३) ते २८ मार्च या कालावधीत श्री स्वामी जयंती उत्सव विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त २३ मार्च ते ३० मार्च या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
२३ ला सकाळी ६ ते ९ विधीवत पूजा, सकाळी नऊनंतर भाविक भक्तांना दर्शन, दुपारी साडेबाराला महाआरती, दुपारी एकला महाप्रसाद, रात्री आठ ते साडेआठ महाआरती, ९ ते १२ महाप्रसाद, ९ पासून सुस्वर स्थानिक भजने, २४ ला रात्री नऊला जिल्हास्तरीय एकेरी नृत्य स्पर्धा होईल. यातील विजेत्यांना अनुक्रमे ७०००, ५०००, ३००० रुपये व सन्मानचिन्ह तसेच उत्तेजनार्थ बक्षीस दिले जाणार आहे. रात्री नऊला अल्पोपहार होईल. २५ ला रात्री नऊला उदय साटम निर्मित मराठी वाद्यवृंद ‘मराठी पाऊल पडते पुढे’ डान्स आणि कॉमेडी, रात्री नऊला अल्पोपहार, २६ ला रात्री दर्शन साटम निर्मित हिंदी वाद्यवृंद ‘मेरी आवाज ही मेरी पहचान’ म्युझिक, मस्ती डान्स कॉमेडी, २७ ला रात्री नऊला जिल्हास्तरीय समूहनृत्य स्पर्धा होईल. यातील विजेत्यांना अनुक्रमे १५०००, १२०००, ९००० रुपये व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ बक्षीस दिले जाईल. रात्री नऊला अल्पोपहार, २८ ला रात्री नऊला विवेकानंद मेस्त्री निर्मित विविध पौराणिक प्रसंगानुसार ‘चमत्कार ट्रिकसन’ सहित गोफ नृत्य, २९ ला रात्री नऊला पंचक्रोशीतील मुलांचे समूह नृत्य व एकेरी नृत्य, अल्पोपहार, ३० ला सांगता सोहळ्यात सकाळी आठ ते साडेआठ महाआरती, एकला महाप्रसाद, रात्री नऊला दशावतार ट्रिकसनसहित होणार आहे. अधिक माहितीसाठी सीताराम सकपाळ यांच्याशी संपर्क साधावा. यावेळी भव्य जत्रोत्सव, आकाश पाळणी, खेळणी, कपड्यांची दुकाने असणार आहेत. या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.