चिपळूणातून गुजरात, कर्नाटकापर्यंत लाकडाची वाहतूक

चिपळूणातून गुजरात, कर्नाटकापर्यंत लाकडाची वाहतूक

rat2011.txt


चिपळुणातून गुजरात, कर्नाटकापर्यंत लाकडाची वाहतूक

तक्रारीनंतरच कारवाई ; जंगलभागातील डोंगर कटाई रोखायला हवी
सकाळ वृत्तसेवा ः
चिपळूण, ता. 20 : चिपळूण तालुक्यात वृक्षतोड करून पश्चिम महाराष्ट्रासह गुजरात आणि कर्नाटकात हजारो टन लाकूड दररोज पाठवला जात आहे. कुंभार्ली घाटमार्गे रात्री ट्रकातून लाकडाची वाहतूक केली जाते. पोफळी येथे वन विभागाचा चेकपोस्ट असताना लाकडाच्या अवैध वाहतुकीवर कोणतीच कारवाई होत नाही. ग्रामस्थांकडून तक्रारी सुरू होताच वन विभागाने कारवाईला सुरवात केली आहे. त्यामुळे लाकूडतोडांचे धाबे दणाणले आहे. वन विभागाने परराज्यात होणाऱ्या लाकडाच्या वाहतुकीवर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शाहनवाज शाह यांनी केली आहे.

तालुक्यातील जंगल भागात गेली अनेक वर्ष डोंगर कटाई सुरू आहे. मात्र त्याची तक्रार होत नसल्यामुळे वन विभागही शांत होते. चिपळूणमध्ये येणाऱ्या महापुराला जंगलतोड कारणीभूत असल्याचा ठपका मोडक समितीने ठेवला. त्यानंतरही येथील वृक्षतोडीवर बंदी घालण्यात आली नाही. येथील लाकूडतोड शेतकऱ्यांकडून कवडीमोल दरात जंगल तोडीसाठी घेतात आणि पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने, उद्योगांना लाकूड पाठवतात. चिपळूणमधून दररोज हजारो टन लाकूड गुजरात आणि कर्नाटक भागात पाठवला जात आहे. नांदिवसे, ओवळी येथे सुरू असलेल्या अवैध वृक्ष तोडीची तक्रार वन विभागाला झाली. त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जावून केवळ 12 घनमीटर अवैध लाकूडसाठा जप्त केला. तोडलेला लाकूडसाठा आणि जप्त केलेला लाकूड साठा यामध्ये तफावत असल्याचे तक्रारदार सांगत आहेत. मात्र तक्रारारदाराकडे दुर्लक्ष केले. नंतर शुक्रवारी अधिकाऱ्यांनी लाकूड भरलेले ट्रक खड्पोली एमआयडीसी येथे सापळा रचून पकडले. त्यामध्ये 29.744 घन मीटर इतके विनापास जळाऊ लाकूड सापडले असून ट्रकसह लाकूड जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी जितेंद्र शांताराम शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वन विभागाने या कारवाईवर समाधान न मानता परराज्यात होणाऱ्या लाकडाच्या वाहतुकीवर बंदी घालावी अशी मागणी शहा यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com