चिपळूण-वाशिष्ठीतील 50 हजार घनमीटर गाळ उपसा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-वाशिष्ठीतील 50 हजार घनमीटर गाळ उपसा
चिपळूण-वाशिष्ठीतील 50 हजार घनमीटर गाळ उपसा

चिपळूण-वाशिष्ठीतील 50 हजार घनमीटर गाळ उपसा

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat२०p१६.jpg-KOP२३L९०२८२ चिपळूण ः प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्यासोबत चर्चा करताना नाम फाऊंडेशनचे मल्हार पाटेकर, गणेश थोरात, समीर जानवलकर, महेंद्र कासेकर, शाहनवाज शाह आदी.
-rat२०p१७.jpg-KOP२३L९०२८३ वाशिष्ठी नदीत सुरू असलेले गाळ उपशाचे काम.
----------
वाशिष्ठीतील ५० हजार घनमीटर गाळ उपसा
गाळमुक्तीसाठी ‘नाम`चे प्रयत्न ; प्रशासनाकडून सहकार्याची हमी
चिपळूण, ता. २० ः शिवनदीपाठोपाठ आता वाशिष्ठी नदीलाही गाळमुक्त करण्यासाठी नाम फाऊंडेशनने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. पहिल्या टप्प्यातील शिल्लक गाळ उपशाची जबाबदारी खांद्यावर घेत दिवस-रात्र काम करून नामच्या यंत्रणेने आजपर्यंत ५० हजार घनमीटर गाळ नदीबाहेर काढला आहे. गोवळकोट धक्का परिसरातील बेट येथे तब्बल २ लाख घनमीटर गाळ काढून येण्या-जाण्यासाठी रॅम्प बनविला जात आहे. या कामाची रविवारी (ता. १९) नामचे मल्हार पाटेकर यांनी पाहणी करीत कामाचा आढावा घेतला.
शहरातील बाजारपूल येथील गणेश विसर्जन घाट, उक्ताड जुवाड बेट, गोवळकोट धक्का यादी ठिकाणी वाशिष्ठी नदीतील गाळ उपशाचे काम सुरू आहे. ९ पोकलेन व १५ डंपरच्या यंत्रसामुग्री यासाठी कार्यरत असून शासनाकडून इंधन पुरवठा केला जात आहे. जलदूत शाहनवाज शाह, नाम फाऊंडेशनचे सदस्य, जलसंपदा विभागाचे अधिकारी या कामावर लक्ष ठेऊन आहेत. येत्या दोन महिन्यांनी पावसाळा सुरू होईल. त्यामुळे वाशिष्ठी नदीतून जास्तीत जास्त गाळ, पाण्याच्या प्रवाहाला अडथळा ठरणारी बेटे काढण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत. कामाचा प्रारंभ झाल्यापासून आतापर्यंत विविध भागातून जवळपास ५० हजार घनमीटर गाळ नदीच्या बाहेर काढण्यात आला आहे. गोवळकोट धक्का येथील बेट काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत तेथून २ लाख घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. नाम फाऊंडेशनचे मल्हार पाटेकर यांनी प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या दालनात आढावा बैठक झाली. या वेळी आमदार शेखर निकम, प्रांताधिकारी प्रवीण पवार, जलसंपदा विभागाचे जगदीश पाटील यांनी नाम फाऊंडेशनच्या कामाचे विशेष कौतुक केले.
यावेळी काढलेला गाळ टाकण्यासाठी जागा कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी दिली. तसेच गाळ टाकण्यासाठी त्यांनी शिरळ येथील जागा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे मल्हार पाटेकर यांना सांगितले.
यावेळी नाम फाऊंडेशनचे गणेश थोरात, कोकण समन्वयक समीर जानवलकर, चिपळूण समन्वयक महेंद्र कसेकर, दिगंबर सुर्वे, मंदार चिपळूणकर, शाहनवाज शाह , धनश्री जोशी, जलसंपदा विभागाचे विपुल खोत, नायब तहसीलदार तानाजी शेजाळ, रूही खेडेकर, छाया सकपाळ, गुलमहम्मद शाह आदी उपस्थित होते.

दृष्टीक्षेपात काम
९ पोकलेन व १५ डंपरच्या यंत्रसामुग्री यासाठी कार्यरत
शासनाकडून इंधन पुरवठा केला जात
पाण्याच्या प्रवाहाला अडथळा ठरणारी बेटे काढण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत
गोवळकोट धक्का येथील बेट काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.