पावस-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावस-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त पट्टा
पावस-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त पट्टा

पावस-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

स्वामी समर्थ मठात
उद्यापासून विविध कार्यक्रम
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील गावखडी श्री स्वामी समर्थ मठात २२ ते २४ मार्च या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २२ मार्चला सायंकाळी ५ वा. मठामध्ये श्री स्वामी नामज्योत प्रज्वलन कार्यक्रम, २३ ला प्रकट दिनी पहाटे ५.३० वा. काकड आरती, सकाळी ८ वा. श्री स्वामी पादुकांवर अभिषेक, महाअभिषेक, स. १० वा. सामुदायिक नामजप, १०.३० वा. सामुदायिक ध्यान, सकाळी ११ वा. श्री स्वामी नाम जप यज्ञ, दुपारी १२ वा. सदगुरुंचे प्रवचन, दुपारी १२.३० वा. महानैवेद्य अपर्ण, महाआरती, दुपारी १ वा. महाप्रसाद, दुपारी ३ पासून श्री स्वामी नाम गजर, सायंकाळी ७ वा. मठाच्या प्रांगणात पालखी परिक्रमा, रात्री ८ वा. नित्याची आरती, २४ ला पालखी सोहळा आरंभ, दुपारी १२.३० वा. महानैवेद्य अपर्ण, महाआरती, दुपारी १ वा. महाप्रसाद, दुपारी ४ वा. श्री स्वामी समर्थ पालखीचे प्रस्थान होणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
-----
सुरभी पाटीलला
तायक्वॉंदोत सुवर्णपदक
रत्नागिरी : तायक्वॉंदो असोसिशन ऑफ महाराष्ट्र आणि रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिशनच्या विद्यमाने ३२ व्या महाराष्ट्र राज्य बालगट तायक्वॉंदो अजिंक्यपद स्पर्धेत रत्नागिरीच्या गणराज तायक्वॉंदो क्लबची सुरभी राजेंद्र पाटील हिने सुवर्णपदक पटकावले. १६ किलोखालील वजनी गटात क्योरोगी प्रकारात तिला पदक मिळाले. या स्पर्धा डेरवण क्रीडा संकुलच्या जिमनॅस्टिक हॉलमध्ये झाल्या. सुरभी पाटील गणराज तायक्वांदो क्लब छत्रपती नगर येथे सौ. आराध्या प्रशांत मकवाना यांच्याकडे ५ वर्षांपासून प्रशिक्षण घेत आहे. तिची महाराष्ट्र संघातही निवड झाली आहे. याबद्दल गणराज क्लबचे अध्यक्ष प्रशांत मकवाना, उपाध्यक्ष अभिजित विलणकर, सचिव जना मोडूळा, खजिनदार नेहा कीर, साक्षी मयेकर, पूजा कवितके, कनिष्का शेरे, भगवान गुरव, एस.आर.के क्लबचे अध्यक्ष शाहरुख शेख, मिलिंद भागवत, क्रीडा शिक्षक अनिकेत पवार यांनी शुभेच्छा दिल्या.


आरगावला रस्ता डांबरीकरण सुरू
लांजा ः तालुक्यातील आरगाव येथील यदरेवाडी जोगळे यांच्या घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ सरपंच सौ. शमिका शैलेश खामकर यांच्या हस्ते झाला. यासाठी भाजपा तालुकाध्यक्ष महेश उर्फ मुन्ना खामकर यांनी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांना आमदार प्रसाद लाड यांच्या आमदार फंडातून या रस्त्यासाठी निधी उपलब्ध झाला. त्यानुसार खडीकरण व डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ सौ. शमिका खामकर यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाला भाजपा तालुकाध्यक्ष मुन्ना खामकर, उपसरपंच स्वानंद कदम, शैलेश खामकर, कविता पांचाळ, यशवंत आमटे, उत्तम आमटे आदी उपस्थित होते.