नगराध्यक्षांमुळे रस्त्याची डागडुजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नगराध्यक्षांमुळे रस्त्याची डागडुजी
नगराध्यक्षांमुळे रस्त्याची डागडुजी

नगराध्यक्षांमुळे रस्त्याची डागडुजी

sakal_logo
By

90297
कणकवली : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील सेवारस्त्यावरील खड्डे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या उपस्थितीत बुजविण्यात आले.


नगराध्यक्षांमुळे रस्त्याची डागडुजी

कणकवलीतील स्थिती; ठेकेदार, ‘महामार्ग’चे दुर्लक्षच

कणकवली, ता.२० : कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या भागातील सेवा रस्त्यावर पडलेले खड्डे आज बुजविण्यात आले. नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला.
येथील खड्डे बुजविण्यासाठी महामार्ग ठेकेदार आणि महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे आम्‍ही सहा महिने पाठपुरावा करत होतो. परंतु या दोन्ही विभागांकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्‍यामुळे अखेर आम्‍ही स्वखर्चाने हे खड्डे बुजविण्याचा निर्णय घेतल्‍याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
कणकवली शहरातील शिवरायांचा पुतळा चौपदरीकरणात बाधित झाला होता. सेवा रस्त्याच्या मधोमध हा पुतळा येत असल्‍याने अपघात होण्याची शक्‍यता होती. तसेच पुतळ्याला धडक बसल्‍यास सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्‍यता होती. त्‍यामुळे सहा महिन्यापूर्वी येथील पुतळा लगतच्या जागेत स्थलांतर करण्यात आला.
पुतळा हटविल्‍यानंतर तेथील भाग खड्डेमय झाला होता. हे खड्डे बुजविण्यासाठी आम्‍ही वारंवार महामार्ग ठेकेदार आणि महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे पाठपुरावा केला होता. परंतु कोणतीही कार्यवाही होत नसल्‍याने आज अखेर आम्‍ही स्वत:च येथील खड्डे बुजविण्याची कार्यवाही सुरू केल्‍याचे श्री.नलावडे म्‍हणाले. यावेळी नगरसेवक अभिजीत मुसळे, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळाचे आनंद पारकर, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी सभापती बाळा जठार, निखिल आचरेकर, पंकज पेडणेकर, नवराज झेमणे, इब्राहिम शेख आदी उपस्थित होते.