आपला आंबा आपणच विकला पाहिजे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आपला आंबा आपणच विकला पाहिजे
आपला आंबा आपणच विकला पाहिजे

आपला आंबा आपणच विकला पाहिजे

sakal_logo
By

-rat२०p२.jpg-
९०२००
कोळंबे : कोळंबे येथे आयोजित आंबा कार्यशाळेला उपस्थित मान्यवर.
-

आपला आंबा आपणच विकला पाहिजे

सचिन नलावडे ; कोळंबेत आंबा कार्यशाळा, अतिसघन पद्धतीने आंबा लागवड करावी

पावस, ता. २० : रत्नागिरी येथील साधारण ५० ते ६० हजार टन आंबाचे उत्पादन घेत असताना येथील बागायतदारांना चांगला दर मिळाला पाहिजे. त्यासाठी शेतकरी हितासाठी आपण एकत्र आले पाहिजे. व्यापारी हे आंबा बागायतदारांची पिळवणूक करून मोठे होतात. मात्र शेतकरी वर्षभर काम करूनही केवळ स्वतः विकत नसल्याने गरीबच राहतात. व्यापारी मात्र २ महिन्यात आंबा विकून भरपूर पैसा कमवतात. त्यामुळे आपला आंबा आपणच विकला पाहिजे. त्यासाठी महादेश हब ही नवी संकल्पना घेऊन आम्ही आलो आहोत, अशी माहिती महादेश फार्मसचे अध्यक्ष सचिन नलावडे यांनी दिली.
कृषी विभाग व महादेश फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने कोळंबे येथे आंबा कार्यशाळा झाली. यामध्ये आंबा खरेदी-विक्रीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला आंबा महर्षी राजगोंडा पाटील, महादेश फार्मर्सचे अध्यक्ष सचिन नलावडे, सचिव सचिन कुलकर्णी, उन्मेष शिंदे, संतोष कुरणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय विनायक बने, विश्वास दामले, सुनील नवले, प्रकाश साळवी, जिल्हा अधीक्षक सुनंदा कुऱ्हाडे, तालुका कृषी अधिकारी नानाजी भुये आदी उपस्थित होते.
अतिसघन आंबा लागवड काळाची गरज याबाबत आंबा महर्षी राजगोंडा पाटील म्हणाले, अतिघन आंबा लागवड फायदे आंबा महर्षी राजगोंडा पाटील यांनी अतिशय सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. एकरी एक हजार आंबा कलमे लागवड १४ फूट बाय ३ या अंतरावरती लागवड करून जास्त उत्पन्न घेऊन स्वतःची व देशाची आर्थिक परिस्थिती मजबूत करावी. शेतकऱ्याने भविष्यात काळात व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून शेती करणे गरजेचे आहे. अतिसघन आंबा लागवड करत असताना ८० टक्के पाणी व्यवस्थापन व खत व्यवस्थापन अत्यंत आवश्यक आहे. आज या ठिकाणी रत्नागिरी तालुक्यातील अनेक बागांची शिवार फेरी करत असताना काही गोष्टी प्रामुख्याने लक्षात आल्या आणि त्याच विषयावर कार्यशाळेमध्ये चर्चा करण्यात आली.
अतिसघन आंबा लागवडीमध्ये दुसऱ्यावर्षी पासून उत्पादन घेता येते. याचे तंत्र समजून सांगितले. पारंपरिक शेतीला फाटा देत अतिसघन आंबा लागवड करणे कितपत योग्य आहे, त्याची या ठिकाणी चर्चा करण्यात आली. आंबा काढणी, हाताळणी व पिकवण्यासाठी मार्गदर्शन करताना सचिन कुलकर्णी यांनी सोप्या पद्धतीने घरगुती छोट्या रॅपनिंग चेंबरचा वापर करून कमी खर्चात उत्तम प्रकारे आंबा पिकवता येईल, असे सांगितले. कार्यशाळेसाठी विवेक दामले, हेमंत फडके, संतोष कुरणे, विवेकानंद कांबळे यांचे सहकार्य लाभले.