
-राजापुरातील आझाद चित्रमंदिर लवकरच होणार खुले
rat२०३.txt
फोटो ओळी
-rat२०p२३.jpg-
९०३१९
राजापूर ः टॉकीजचा बाहेरचा पॅसेज.
-
राजापुरातील आझाद चित्रमंदिर होणार खुले
राजापूर, ता. २० ः राजापूरच्या मनोरंजन क्षेत्रातील वैभवशाली इतिहासाचे साक्षीदार असलेले शहरातील आझाद चित्र मंदिर लवकरच सुरू होणार आहे. व्यवस्थापनाने आझाद चित्रमंदिराला दिलेला नवा साज प्रेक्षकांना निश्चितच सुखावणारा आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून शहरातील टॉकिजमध्ये जावून चित्रपट पाहण्याची अनुभूती घेण्याची संधी मिळणार आहे.
मनोरंजन क्षेत्राचा राजापूरला वैभवशाली इतिहास लाभला असून काही वर्षापूर्वी शहरामध्ये त्या काळातील दर्जेदार नाटकं होत होती. मात्र, मधल्या काळामध्ये विविध कारणांमुळे नाटकांचे कार्यक्रम होणे बंद झाले आहे. पालिकेने उभारलेल्या नाट्यगृहामध्ये वर्षभरामध्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच नाटके होतात. त्यामुळे राजापूरकरांना फारशा मनोरंजन अनुभवण्याच्या संधी मिळत नाही. अशा स्थितीमध्ये गेल्या काही वर्षापासून बंदस्थितीमध्ये असलेले आझाद चित्रमंदिर काही दिवसात नव्याने सुरू होणार आहे. मिनी मल्टीप्लेक्स रूपातील असलेले टॉकीज कोविडपूर्वी सुरू करण्याचे व्यवस्थापनाचे प्रयत्न सुरू होते. मात्र, कोविड आणि त्यानंतर काही कारणास्तव ते प्रयत्न अपुरे ठरले. मात्र, आता प्रशासकीय बाबींची पूर्तता करून पुन्हा एकदा टॉकिज सुरू करण्याच्या व्यवस्थापनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.