रोणापालपर्यंत पाणी आलेच नाही

रोणापालपर्यंत पाणी आलेच नाही

90322
सावंतवाडी ः तिलारी पाटबंधारे कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांच्याशी चर्चा करताना सुरेश गावडे, प्रकाश वालावलकर, सुनेत्रा खानोलकर, ज्ञानेश परब आदी.


रोणापालपर्यंत पाणी आलेच नाही

शेतकऱ्यांची खंत; ‘तिलारी’च्या अधिकाऱ्यांना ३१ मार्चची डेडलाईन, आंदोलनाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २० ः तिलारी आंतरराज्य जलविद्युत पाटबंधारे प्रकल्पाच्या बांदा-ओटवणे-इन्सुली कालव्यातून रोणापालपर्यंत ३१ मार्चपर्यंत पाणी येईल, असे कार्यकारी अभियंता यांनी आश्वासन दिले आहे. या आश्वासनाची पूर्तता न केल्यास १ एप्रिलला कालवा विभागाच्या चराठा येथील कार्यालयासमोर गळफास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांच्यावतीने रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे यांनी दिला.
शेतकऱ्यांनी तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांची भेट घेतली. त्यावेळी चर्चेदरम्यान सुरेश गावडे, शेतकरी प्रकाश वालावलकर व अन्य मान्यवर बागायतदारांनी हा इशारा दिला. यावेळी वाफोली, रोणापाल, मडुरा आदी भागातील शेतकऱी उपस्थित होते. गतवर्षी बांदा-ओटवणे-इन्सुली-रोणापाल कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते. यंदा अजूनही पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे बागायतीसह भाजीपाला करून सिंचनाचा वापर करणारे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. याकडे गावडे, वालावलकर, खानोलकर यांनी लक्ष वेधले. पाणी बंद असल्याने हंगामी पिके व लागवड पाण्याअभावी तडफडत आहे, असे श्रीमती खानोलकर यांनी सांगितले. गेल्या तीस वर्षांपासून कालवा कामे सुरू आहेत. शेतकरी ४२ वर्षे पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. अधिकारी व ठेकेदार यांच्यातील साटेलोट्यामुळे बागायतदार शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कालवा कामे अपूर्ण तर गाळ काढण्याचे काम कासवगतीने केले जात आहे. कालवे फुटण्याच्या घटनांमुळे शेतकरी पाण्याअभावी चिंतेत आहेत. यंत्रणेने ३१ मार्चपर्यंत पाणी मिळण्याचे आश्वासन दिले आहे, त्याची पूर्तता करावी, अन्यथा १ एप्रिलला गळफास आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला. कालव्यातील गाळाचे ढीग वेळीच उचलले नाही तर पुन्हा कालवे पावसाळ्यात मातीने भरून जातील यासह वाफोलीमधील कालवा कामाबाबत संजय आईर यांनी लक्ष वेधले. यावेळी ज्ञानेश परब, उदय गंवडे, बाळू गावडे, अरुण पंडित, कृष्णा गावडे, शाम म्हाडगुत, उदय देऊलकर व अन्य मान्यवर शेतकरी उपस्थित होते.
...............
चौकट
जलदगतीने कार्यवाही सुरू
रोणापालपर्यंत पाणी येत्या ३१ मार्चपर्यंत पोहोचले पाहिजे, असे प्रयत्न सुरू आहेत. मध्यंतरी आंबेली येथे कालवा दुरुस्तीमध्ये वेळ गेला. सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळावे, असे जलसंपदा विभागाचे धोरण आहे. या नियोजनाप्रमाणे जलदगतीने कार्यवाही केली जात आहे. शेतकऱ्यांना सिंचनाचा वापर करता येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे कार्यकारी अभियंता रोहित कोरे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com