रत्नागिरी- संक्षिप्त

रत्नागिरी- संक्षिप्त

rat2017.txt
KOP23L90235
-rat20p3.jpg- अन्वर मेमन, तुषार मलुष्टे.
-----------
कन्झ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युशन
फेडरेशनच्या अध्यक्षपदी अन्वर मेमन
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कन्झ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युशन फेडरेशनच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अन्वर मेमन यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. उपाध्यक्ष नितीन तलाठी, सेक्रेटरी तुषार मलुष्टे, खजिनदारपदाची जबाबदारी महेश चव्हाण यांची निवड करण्यात आली. फेडरेशनच्या नव्या कार्यकारिणीचा जुन्या कार्यकारिणीचे पदाधिकारी सुहासभाऊ पटवर्धन, सुधीर मलुष्टे, सतीश दळी आणि नाना देवळेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुहासभाऊ पटवर्धन यांना पुणे चेंबर ऑफ कॉमर्सचा आदर्श व्यापारी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल रत्नागिरी जिल्हा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स डिस्ट्रिब्युशन फेडरेशनतर्फे त्यांचा गौरव करण्यात आला. व्यावसायिक वाटचालीत येणाऱ्या अडचणींविषयी कल्पना देऊन त्यातून बाहेर पडण्याविषयी सतीश दळी यांनी नूतन कार्यकारिणीसह व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक रत्नागिरी जिल्हा कन्झ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युशन फेडरेशनचे माजी अध्यक्ष आनंद देवस्थळी यांनी केले. ॲड. मनोहर दळी यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com