Sun, May 28, 2023

मालवणात कर्मचाऱ्यांचे
‘थाळी बजाव’ आंदोलन
मालवणात कर्मचाऱ्यांचे ‘थाळी बजाव’ आंदोलन
Published on : 20 March 2023, 1:26 am
90337
मालवण ः पंचायत समिती कार्यालयासमोर शासकीय कर्मचाऱ्यांनी थाळी बजाव आंदोलन केले.
मालवणात कर्मचाऱ्यांचे ‘थाळी बजाव’
मालवण : जुनी पेन्शन लागू करावी, या मागणीसाठी राज्यभरातील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यातच ‘एकच मिशन जुनी पेन्शन’, असा नारा देत आज येथील पंचायत समिती कार्यालयासमोर विविध शासकीय विभागांतील कर्मचाऱ्यांनी ‘थाळी बजाव’ आंदोलन केले. यावेळी उपस्थित शेकडो कर्मचाऱ्यांनी जोरदार थाळ्या वाजवत जुन्या पेन्शनच्या मागणीबाबत सरकारचे लक्ष वेधले. दरम्यान, दुपारी संप मागे घेण्यात आला. येथील पंचायत समिती कार्यालयासमोर एकत्र येत पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांसह इतर शासकीय विभागांतील कर्मचाऱ्यांनी जोरदार थाळ्या वाजवल्या.