मालवणात कर्मचाऱ्यांचे ‘थाळी बजाव’ आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवणात कर्मचाऱ्यांचे
‘थाळी बजाव’ आंदोलन
मालवणात कर्मचाऱ्यांचे ‘थाळी बजाव’ आंदोलन

मालवणात कर्मचाऱ्यांचे ‘थाळी बजाव’ आंदोलन

sakal_logo
By

केवळ फोटो
90343
शबय शबय...
बांदा ः शहराच्या शिमगोत्सवाची आज सांगता झाली. काल (ता. २०) रात्री शहरातील मोर्येवाडा येथे युवकांनी विविध सोंगे रंगवून ‘शबय’ची परंपरा कायम राखली. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)
---
90337
मालवण ः पंचायत समिती कार्यालयासमोर शासकीय कर्मचाऱ्यांनी थाळी बजाव आंदोलन केले.

मालवणात कर्मचाऱ्यांचे ‘थाळी बजाव’
मालवण : जुनी पेन्शन लागू करावी, या मागणीसाठी राज्यभरातील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यातच ‘एकच मिशन जुनी पेन्शन’, असा नारा देत आज येथील पंचायत समिती कार्यालयासमोर विविध शासकीय विभागांतील कर्मचाऱ्यांनी ‘थाळी बजाव’ आंदोलन केले. यावेळी उपस्थित शेकडो कर्मचाऱ्यांनी जोरदार थाळ्या वाजवत जुन्या पेन्शनच्या मागणीबाबत सरकारचे लक्ष वेधले. दरम्यान, दुपारी संप मागे घेण्यात आला. येथील पंचायत समिती कार्यालयासमोर एकत्र येत पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांसह इतर शासकीय विभागांतील कर्मचाऱ्यांनी जोरदार थाळ्या वाजवल्या.
--
बचतगट वस्तूंचे शुक्रवारपासून प्रदर्शन
सिंधुदुर्गनगरी : आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य म्हणून २०२३ हे वर्ष साजरे करण्यात येत आहे. (नवतेजस्विनी) महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माविम बचतगटांतील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे जिल्हास्तरीय भव्य प्रदर्शन व विक्री २४ ते २७ दरम्यान जेटी बंदर, मालवण येथे आयोजित केले आहे, अशी माहिती माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी नितीन काळे यांनी दिली. प्रदर्शनाचे उद्‌घाटन शुक्रवारी दुपारी एकला सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात येणार आहे.