राजापुरात निघणार बुधवारी स्वागत यात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापुरात निघणार बुधवारी स्वागत यात्रा
राजापुरात निघणार बुधवारी स्वागत यात्रा

राजापुरात निघणार बुधवारी स्वागत यात्रा

sakal_logo
By

rat2040.txt

बातमी क्र. 40 (पान 2 साठी)
(टीप- रत्नागिरीच्या बातमीत ही पोटबातमी म्हणून घ्यावी.)

राजापुरात निघणार बुधवारी स्वागत यात्रा

राजापूर, ता. 20 ः राजापूरची ग्रामदेवता श्री निनादेवीच्या मंदिरापासून सकाळी 9.30 वा. धर्मध्वजाचे पूजन करून पारंपरिक पद्धतीने यात्रेला प्रारंभ होईल. त्यानंतर मुख्य रस्ता, जवाहरचौक शिवस्मारक, संभाजीपेठ, मधीलवाडा, गणेशघाट, छत्रपती शिवाजी पथमार्गे जवाहरचौक अशी ही यात्रा काढण्यात येणार आहे. जवाहरचौक चव्हाटा मंदिर येथे महाआरतीने स्वागतयात्रेची सांगता होणार आहे. या स्वागत यात्रेमध्ये सर्व हिंदू बांधव आणि भगिनींनी पारंपरिक वेषात सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष राजेंद्र कुशे, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश मयेकर, शिवस्मृती मंडळाचे अध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी केले आहे.