असरोंडी, पिंगुळी येथे 
११० जणांचे रक्‍तदान

असरोंडी, पिंगुळी येथे ११० जणांचे रक्‍तदान

90351
असरोंडी : येथे शिबिरावेळी आमदार वैभव नाईक यांच्याहस्ते रक्‍तदात्‍यांचा सत्‍कार करण्यात आला.

असरोंडी, पिंगुळी येथे
११० जणांचे रक्‍तदान
कणकवली, ता.२० : आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आजपासून महारक्‍तदान शिबिराचा प्रारंभ झाला. यात असरोंडी येथे ५५ तर पिंगुळी येथील शिबिरात ४५ जणांनी रक्‍तदान केले. पुढील दोन दिवसांत पावशी आणि शिरवल येथे रक्‍तदान शिबिर होणार आहे. एकूण ५०० बाअल्‍या रक्‍तसंकलनाचा संकल्‍प करण्यात आल्‍याची माहती शिवसेना कार्यालयाकडून देण्यात आली.
आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होणार आहे. यात रक्‍तदान शिबिरे घेतली जात आहेत. यात आज असरोंडी आणि पावशी येथे रक्‍तदान शिबिर झाले. असरोंडी येथील शिबिरामध्ये ५ महिलांनीही रक्‍तदान केले. उद्या (ता.२१) कुडाळ शिवसेना शाखा, २४ मार्च रोजी घोटगे तर २६ मार्च रोजी शिरवल येथील फार्मसी कॉलेजमध्ये रक्‍तदान शिबिर होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com