वेंगुर्ले येथे मोटारीसह 40 हजाराची दारू जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेंगुर्ले येथे मोटारीसह 
40 हजाराची दारू जप्त
वेंगुर्ले येथे मोटारीसह 40 हजाराची दारू जप्त

वेंगुर्ले येथे मोटारीसह 40 हजाराची दारू जप्त

sakal_logo
By

90359

वेंगुर्ले ः दारू वाहतूक प्रकरणी ताब्यात घेतलेली मोटार.


वेंगुर्ले येथे मोटारीसह
४० हजाराची दारू जप्त
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २० ः शहरातील कलानगर येथे काल (ता. १९) बेकायदा दारू वाहतुकीवर कारवाई केली. रात्री दीड वाजता नंबर प्लेट नसलेल्या स्विफ्ट कारला वेंगुर्ले पोलिसांनी थांबवून तपासणी केली असता त्यात गोवा बनावटीची ४० हजार रुपये किंमतीची दारू सापडली. या कारवाईत मोटारीसह १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वेंगुर्ले पोलिसांना पांढऱ्या रंगाच्या नंबरप्लेट नसलेल्या मोटारीबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिस निरीक्षक अतुल जाधव त्यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल योगेश वेंगुर्लेकर, परशुराम सावंत, ट्रॅफिक पोलिस पांडुरंग खडपकर, अमर कांडर यांनी शहरातील कलानगर येथे सापळा रचून रात्री दीड वाजता कारवाई केली. गाडीची तपासणी केली असता ४० हजार रुपये किंमतीच्या गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या आढळल्या. या कारवाईत मोटारीसह १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. या प्रकरणी चालक सुधीर श्रीराम आगरवाडेकर (१९) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास हेडकॉन्स्टेबल योगेश वेंगुर्लेकर करत आहेत.