चिपळूण अर्बन सुरू करणार गोल्ड ओव्हरड्राफ्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण अर्बन सुरू करणार गोल्ड ओव्हरड्राफ्ट
चिपळूण अर्बन सुरू करणार गोल्ड ओव्हरड्राफ्ट

चिपळूण अर्बन सुरू करणार गोल्ड ओव्हरड्राफ्ट

sakal_logo
By

चिपळूण अर्बनची गोल्ड ओव्हरड्राफ्ट योजना

संचालकांचा निर्णय ; गुढीपाडव्यापासून होणार सुरूवात

चिपळूण, ता. २० ः येथील चिपळूण अर्बन बॅंकेतर्फे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर स्थानिक व्यापारी, सर्वसामान्य ग्राहक यांच्यासाठी गोल्ड ओव्हरड्राफ्ट कर्ज योजना सुरू करण्यात येणार आहे. बॅंकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष निहार गुढेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
याबाबत बॅंकेचे चेअरमन गुढेकर म्हणाले, ‘यामध्ये ग्राहकांना सोने तारणावर २० लाखापर्यंत कर्ज दिले जाणार आहे. दैनंदिन व्यवहार याच खात्यातून करण्याची सोय बँकेने उपलब्ध करून दिली आहे. या खात्याला चेकबुकची फॅसिलिटी असून ठराविक उलाढाल करण्याबरोबर चिपळूण अर्बन बॅंक ही स्थानिक बॅंक असल्याने चिपळूण व इतर शाखा परिसरातील नोंदणीकृत चॅरिटेबल ट्रस्ट, देवस्थान, शैक्षणिक ट्रस्ट यांच्या अनेक वर्षापासून ऋणानुबंध आहेत. त्यासाठी सामाजिक बांधिलकीचा विचार करता अशा प्रकारच्या सर्व संस्थांच्या नवीन जमा होणाऱ्या मुदत ठेवीवर सर्वसामान्य व्याजदरापेक्षा ०.२५ टक्के अतिरिक्त व्याजदर दिला जाणार असल्याचाही निर्णय संचालक मंडळ सभेमध्ये घेतला असल्याची माहिती गुडेकर यांनी दिली. २५ लाखापर्यंतचा कर्ज पुरवठा तत्काळ होण्याच्या दृष्टीने २४ तासात मंजुरी देण्यात येईल. यामध्ये वाहन कर्ज, हौसिंग कर्ज, व्यापारी वर्गासाठी असलेल्या अनेक सुविधांचा लाभ घेता येणार आहे. चिपळूण अर्बन बॅंकेचे गृहबांधणी, वाहन तारण कर्जाचे व्याजदर हे केवळ ८.२५ टक्केपासून सुरू असून ते राष्ट्रीयकृतपेक्षा कमी असल्याने या सर्व योजनेचा लाभ बँकेच्या सभासद खातेदार, ग्राहक यांनी घ्यावा, असे आवाहन केले आहे.

...............मुझफ्फर खान.................