
रत्नागिरी-वेतोशी येथे जागर संविधानाचा कार्यक्रम उत्साहात
जागर संविधानाचा
वेतोशी येथे कार्यक्रम
देवरूख, ता. २० ः रत्नागिरी तालुक्यातील वेतोशी येथील आपुलकी फाउंडेशन यांच्या अधिपत्याखाली जागर संविधानाचा कार्यक्रमांतर्गत महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पतीच्या निधनानंतर कुटुंबाचा आधार बनून संसाराचा गाडा हाकणाऱ्या विधवा महिलांचा सन्मान करून समाजापुढे आपुलकी फाउंडेशनने आदर्श ठेवला आहे.
पतीच्या निधनानंतर समाजात मिळणारी वागणूक व होणारी हेळसांड थांबवण्यासाठी क्रांतिकारी विचार घेऊन महिला मेळावा हळदी कुंकू व खेळ पैठणीचा होमिस्टर या सारखे कार्यक्रम राबविण्यात आले, त्याच बरोबर व्यसनाधीन जाणाऱ्यासाठी समाजप्रभोधन करण्याचा मानस या कार्यक्रमात करण्यात आला. प्लास्टिकचा होणारा वापर कमी करण्याचे आवाहन करण्यात आले. गरजू विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. फाउंडेशनचे पदाधिकारी विष्णू राबाडे, दीपक माचिवले, अमोल कांबळे, यशवंत माचीवले, योगेश कांबळे, संजय माचिवले उपस्थित होते.