‘उद्योजकता विकास’अंतर्गत सावंतवाडीत मोफत प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘उद्योजकता विकास’अंतर्गत
सावंतवाडीत मोफत प्रशिक्षण
‘उद्योजकता विकास’अंतर्गत सावंतवाडीत मोफत प्रशिक्षण

‘उद्योजकता विकास’अंतर्गत सावंतवाडीत मोफत प्रशिक्षण

sakal_logo
By

‘उद्योजकता विकास’अंतर्गत
सावंतवाडीत मोफत प्रशिक्षण
सावंतवाडी, ता. २० ः येथील श्री साई इन्फोटेक (एसएसआय कॉम्प्युटर) सावंतवाडी येथे प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२२-२३ या मार्फत जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण मोफत शिकविले जाणार आहे. या अभ्यासक्रमासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री साई इन्फोटेक, सावंतवाडीचे रघुनाथ तानावडे यांनी केले आहे.
या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ४५ इतके असावे. उमेदवार सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे. या योजनेमध्ये डोमेस्टिक डाटा इन्ट्री ऑपरेटर, अकाउंट एक्झिक्युटिव्ह, गेस्ट सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह या अभ्यासक्रमांचा समावेश केला आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी केंद्राला भेट द्यावी. तसेच अधिक माहितीसाठी दूरध्वी क्रमांकावर संपर्क साधावा किंवा नोंदणी लिंकवर फॉर्म भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.