बस-दुचाकी अपघातात
आवडेत दोघे जखमी

बस-दुचाकी अपघातात आवडेत दोघे जखमी

९०३६५

बस-दुचाकी अपघातात
आवडेत दोघे जखमी
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २० ः एसटी बस व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दोघे दुचाकीस्वार जखमी झाले. चालक विजय गुरव व देविदास टोपले अशी जखमींची नावे आहेत. आवडे येथे आज सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
दोडामार्ग-पाळये ही बस आज सकाळी दोडामार्गहून पाळये येथे जात होती. आवाडे येथे आली असता एक पादचारी बसच्या डाव्या बाजूने अचानक रस्त्यावर बससमोर आला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने बस उजव्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेी समोरून साटेली भेडशीच्या दिशेने येणारी दुचाकी बसच्या समोर आल्याने समोरासमोर धडक बसून अपघात घडला. दुचाकी समोरून बसच्या खाली गेली. दोघेही दुचाकीस्वार बाजूला फेकले गेल्याने दुर्घटना टळली. दोघेही किरकोळ जखमी झाले. त्यांना रुग्णवाहिकेने येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. हे प्रकरण सामोपचाराने मिटविण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com