क्राईम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्राईम
क्राईम

क्राईम

sakal_logo
By

rat२०२६.txt

(पान ३ साठी क्राईम)

दाम्पत्याने लांबविली दागिन्यांसह रोकड

रत्नागिरी : तालुक्यातील शिरगांव येथील घरातून दाम्पत्याने सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लांबवली. हा प्रकार २१ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२३ या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौतम पवार आणि स्मिता पवार (दोन्ही मुळ रा. किणी वठार हातकणंगले, कोल्हापूर सध्या रा. रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित पती पत्नीची नावे आहेत. त्यांच्या विरोधात मयेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संशयित दाम्पत्याने मयेकर यांच्या पत्नीच्या रूममधील लोखंडी कपाटातून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लांबवले. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.
-
विजेच्या खांबावर आदळून दुचाकीस्वार ठार

रत्नागिरी : तालुक्यातील वरवडे येथे दुचाकी विजेच्या खांबावर आदळून झालेल्या अपघातात चालक ठार झाला. ही घटना शनिवारी ( ता.१८) सायंकाळी घडली. जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मनोज महादेव शिवगण (वय ३२, रा. शिवगणवाडी, मालगुंड) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी ते दुचाकी घेऊन वरवडे ते खंडाळा, असे जात होते. ते गुरववाडी येथील चढात आल्यावर दुचाकीसमोर अचानक बैल आडवा आल्याने त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि दुचाकी रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या विजेच्या पोलवर आदळली. या अपघातात मनोज गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
-

शेतीचे साहित्य अज्ञाताने लांबविले

रत्नागिरी : तालुक्यातील टिके-शिंदेवाडी येथे शेती संरक्षणासाठी लावलेले साहित्य अज्ञाताने लांबवले. हा प्रकार शुक्रवारी १७ ते १८ मार्च या कालावधीत घडला. मोईन हाशम मसुरकर (वय २५, रा. शिंदेवाडी टिके, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. मसुरकर यांची शिंदेवाडी येथे शेती आहे. शेती संरक्षणासाठी त्यांनी आपल्या शेतात काही साहित्य बसवलेले होते. ते अज्ञात चोरट्याने चोरून नेले असून याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.
-