-शेततळ्यात पडलेल्या खवले मांजराला जीवदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

-शेततळ्यात पडलेल्या खवले मांजराला जीवदान
-शेततळ्यात पडलेल्या खवले मांजराला जीवदान

-शेततळ्यात पडलेल्या खवले मांजराला जीवदान

sakal_logo
By

rat२०४९.txt

(पान ३ साठी)

फोटो ओळी
-rat२०p२७.jpg-
९०३७२
चिपळूण ः शेततळ्यात पडलेल्या खवले मांजराला वनविभागाने जीवदान दिले.
-
शेततळ्यात पडलेल्या खवले मांजराला जीवदान

चिपळूण, ता. २० ः शहरालगत असलेल्या धामणवणे येथील शेतामधील शेत तळ्यात पडलेल्या खवले मांजरास वनविभागाने जीवदान दिले आहे. धामणवणे येथील शेततळ्यामध्ये खवले मांजर पडले असल्याची माहिती राम रेडीज यांनी दूरध्वनीद्वारे वन विभागाला दिली. यानंतर शेततळ्यात जावून पडलेल्या खवले मांजराची रेस्क्यू करण्यासाठी वनविभागाचे वन्यप्राणी बचाव पथक तत्काळ घटनास्थळी पोहचले. खवले मांजरास वनविभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत ताब्यात घेवून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. हे बचावकार्य विभागीय वन अधिकारी दीपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली व परिक्षेत्र वन अधिकारी राजश्री कीर, वनरक्षक रामपूर श्री. शिंदे, वनरक्षक कोळकेवाडी राहूल गुंठे व वाहनचालक नंदकुमार कदम यांनी पूर्ण केले.