
स्कूल बसला भीषण अपघात
rat२०५०.txt
-rat२०p२८.jpg-
९०३७७
चिपळूण ः कापसाळ डिगेवाडी बसथांब्यासमोर स्कूलबसची आणि मोटारीची समोरासमोर धडक झाली.
---
स्कूल बस मोटारीची समोरासमोर धडक
१४ विद्यार्थी सुखरूप ; कापसाळ-डिगेवाडी बस स्थानकासमोरील घटना
चिपळूण, ता. २० ः मुंबई-गोवा महामार्गावर कापसाळ-डिगेवाडी बस स्थानकासमोर सोमवारी (ता. २०) सकाळी साडेदहा वाजता मोटार व स्कूल बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात स्कूलबसमधील १४ विद्यार्थी बचावले.
महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. त्यासाठी काही ठिकाणी रस्ता बंद ठेवून कामं केली जात आहेत. मात्र त्याबाबतचे दिशादर्शक फलक उभारण्यात न आल्याने व काहीजण चुकीच्या दिशेने वाहने चालवत असल्याने वारंवार अपघात घडत आहेत. हाही अपघात अशाच पद्धतीचा झाला आहे. मोटार चालक संदीप सावंत हे रत्नागिरीहून खेडकडे जात होते. कामथे-डिगेवाडी बस थांब्यासमोर एक स्कूल बस विरुद्ध दिशेने आल्याने सामोरासमोर धडक बसली. त्यामुळे मोटार जागीच उलटली. या अपघाताचा मोठा आवाज झाल्याने स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तातडीने स्कूल बसमधील १४ विद्यार्थ्यांना गाडी बाहेर काढले. ते सर्वजण सुखरूप आहेत. तसेच विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे अधिकारी मोटारीत गाडीत होते. त्यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली. मात्र या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर खबरदारी म्हणून त्याठिकाणापासूनचा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला होता. या घटनेचा पोलिसांमार्फत पंचनामा करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.