कुडाळ एमआयडीसीत पुन्हा 
कचरा प्रकल्पासाठी हालचाली

कुडाळ एमआयडीसीत पुन्हा कचरा प्रकल्पासाठी हालचाली

90389
कुडाळ ः एमआयडीसीतील कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला विरोधाबाबतचे निवेदन एमआयडीसी अभियंता रेवडकर यांना सोमवारी देताना उद्योजक.

कुडाळ एमआयडीसीत पुन्हा
कचरा प्रकल्पासाठी हालचाली
स्थानिकांचा विरोध; नगरपंचायतीस निवेदन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २० ः येथील एमआयडीसीत कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याच्या हालचाली नगरपंचायतीतर्फे पुन्हा सुरू झाल्या आहेत. त्याला स्थानिकांचा विरोध आहे. आज स्थानिकांनी याबाबत नगरपंचायतीला निवेदनही दिले.
येथील नगरपंचायतीकडून एमआयडीसी प्लॉट क्रमांक जी ०२ मध्ये कचरा व्यवस्थापन प्रकल्प (डेपो) सुरू करण्याच्या हालचाली तीन वर्षांपूर्वी सुरू होत्या. त्यावेळी स्थानिक, येथील कंपन्यांचे मालक, एमआयडीसी असोसिएशन आणि पिंगुळी ग्रामपंचायत यांनी विरोध केल्याने कुडाळ नगरपंचायतीने काम स्थगित केले होते; मात्र आता याच ठिकाणी पुन्हा कचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जी ०२ प्लॉटची साफसफाई सुरू असून याबाबत पिंगुळीवासीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित जी ०२ भूखंडाच्या बाजूस औद्योगिक, वाणिज्य आस्थापनांसह निवासी आस्थापने आणि प्राथमिक-माध्यमिक विद्यालय, नर्सिंग स्कूल आहेत. कचऱ्याची वाहतूक करताना मोठ्या प्रमाणात दुर्गंधी निर्माण होऊन भविष्यात या भागात रोगराई पसरू शकते. त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. प्रकल्पाला स्थानिकांसह एमआयडीसीतील रहिवाशांचा विरोध असल्याने हा प्रकल्प एमआयडीसी भागात आणू नये, अशी मागणी निवेदनाद्वारे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, नगराध्यक्षांकडे करण्यात आली. यावेळी उमेश गाळवणकर, सुधाकर गाळवणकर, राजेंद्र परब, कुलदीप पटेल, प्रफुल्ल सामंत, राधाकृष्ण परुळेकर उपस्थित होते.
..............

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com