राजेश घाटवळ यांचा रोटरीतर्फे सन्मान

राजेश घाटवळ यांचा रोटरीतर्फे सन्मान

९०३९०
वेंगुर्ले ः राजेश घाटवळ यांना बेस्ट असिस्टंट गव्हर्नर वॉर्ड व सन्मानचिन्ह प्रदान करताना नासीर बोरसादवाला.

राजेश घाटवळ यांचा रोटरीतर्फे सन्मान
वेंगुर्ले ः सिंधुदुर्गातील रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर राजेश घाटवळ यांना रोटरी वर्ष २०२१-२२ चा ‘रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० बेस्ट असिस्टंट गव्हर्नर वॉर्ड’ व सन्मानचिन्ह हा प्रतिष्ठेचा अॅवॉर्ड देऊन भावी प्रांतपाल नासीर बोरसादवाला यांच्या हस्ते गौरविण्यात आले. हा सोहळा रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० च्या ६४ व्या अष्टबंधनम् डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्समध्ये झाला. यावेळी २०२१-२२ चे प्रांतपाल गौरीश धोंड, फर्स्ट लेडी प्रतिमा धोंड, विद्यमान प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे, माजी प्रांतपाल डॉ. विनय पै-रायकर, गुरुदत्ता भक्ता, राजन देशपांडे, वासुदेव देशिगकर, आनंद कुलकर्णी, रविकिरण कुलकर्णी, डॉ. गिरीश मसुरकर, संग्राम पाटील, शरद पै, अरुण भंडारे, तत्कालीन डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी सनत पिळगावकर, सुभाष साजने, राजेश साळगावकर, किशोर धुमे, पराग सरदेसाई, अजय मेनन, माधवी शेटये-बांदेकर उपस्थित होते.
--
आरोसला आजपासून दशावतार नाट्यमहोत्सव
सावंतवाडी ः श्री देव गिरोबा युवक नाट्यमंडळ आरोस आयोजित श्रीदेव गिरोबा रंगमंच आरोस-गिरोबावाडी येथे रामनवमीनिमित्त २२ ते ३१ मार्च दरम्यान नाट्यमहोत्सवाचे आयोजन केले आहे. २२ ते ३१ या कालावधीत रोज सायंकाळी सातला कीर्तन व रात्री साडेनऊला नाट्यप्रयोग होणार आहे. यामध्ये २२ ला महापुरुष नाट्यमंडळ सावंतवाडी यांचा ‘शिव भंडारेश्वर’, २३ ला नाईक मोचेमाडकर मंडळ, वेंगुर्ले यांचा ‘पद्यनाभ स्वर्गप्राप्ती’, २४ ला कलेश्वर नेरुर (भाई कलिंगण) यांचा ‘अर्धशिरा’, २५ ला श्री देव समुद्रनाथ पाट-परुळे यांचा ‘भिमकी हरण’ अर्थात ‘रुक्मिणी स्वयंवर’, २६ ला हेळेकर कारिवडे यांचा ‘आईचा महिमा’, २७ ला अष्टविनायक निरवडे यांचा ‘माहेरवाशिणी आई भवानी’, २८ ला दत्तमाऊली सिंधुदुर्ग यांचा ‘किमिक्षक व्रत’, ३० ला दुपारी बाराला रामजन्म, रात्री दहाला श्री देव गिरोबा युवक नाट्यमंडळ, आरोस यांचा प्रवीण मांजरेकर दिग्दर्शित सामाजिक दोन अंकी मालवणी नाटक ‘गावकी’, ३१ ला रात्री साडेनऊला कलेश्वर नेरुर यांचा ट्रिकसिनयुक्त ‘अजिंक्यतारा’ नाट्यप्रयोग होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com