''आंब्रड''च्या विकासासाठी कटिबद्ध

''आंब्रड''च्या विकासासाठी कटिबद्ध

90448
आंब्रड ः ग्रामस्थांच्यावतीने आमदार वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला.

‘आंब्रड’च्या विकासासाठी कटिबद्ध

आमदार वैभव नाईक; विविध विकासकामांबाबत ग्रामस्थांतर्फे सत्कार

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २१ ः आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या मागणीनुसार आणि पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ अंतर्गत आंब्रड परबवाडी नाटेकरवाडी ते कुंदे कदमवाडी जाणाऱ्या रस्त्यासाठी ४ कोटी ३९ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला. आंब्रड आणि कुंदेवासीयांची गरज ओळखून आमदार नाईक यांनी हा रस्ता मंजूर केल्याबद्दल शनिवारी (ता. १८) आंब्रड गावाच्यावतीने त्यांचा जाहीर सत्कार करत आभार मानले. आंब्रड गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी आमदार नाईक यांनी दिली.
त्याचप्रमाणे आंब्रड-कुंदे मुख्य रस्ता ते आंब्रड रतांबेवाडी चंद्रकांत गावडे यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी आमदार नाईक यांनी आपल्या आमदार फंडातून ५ लाख रुपये निधी मंजूर केला. त्यांच्या उपस्थितीत सरपंच मानसी कदम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या भूमिपूजन प्रसंगी विभाग प्रमुख विकास राऊळ, विभाग संघटक दिनकर परब, सरपंच मानसी कदम, उपसरपंच विठ्ठल तेली, माजी पंचायत समिती सदस्य प्रवीण भोगटे, माजी सरपंच संदीप परब, माजी उपसरपंच विजय परब, आनंद परब, माजी जिल्हा परिषद सदस्या कल्पिता मुंज, ग्रामपंचायत सदस्य सागर वाळके, सेजल परब, तात्या आंगणे, शाखा प्रमुख रमेश परब, बबन परब, अशोक मसूरकर, सीताराम नाटेकर, दयानंद तावडे, अनिल परब आदींसह शिवसैनिक व आंब्रड ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--
तलावाचा प्रश्नही सोडवू ः नाईक
यावेळी आमदार वैभव नाईक यांनी आंब्रड सरमळेवाडी येथील तलावाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. याबाबत लवकरच ग्रामस्थ आणि संबंधित अधिकारी यांची बैठक बोलावून हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे ते म्हणाले. आंब्रड, कुंदे गावांच्या विकासासाठी आवश्यक तो निधी पुरविला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com