‘रवळनाथ चषक’ स्पर्धेचे पाडलोस येथे उद्‍घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘रवळनाथ चषक’ स्पर्धेचे
पाडलोस येथे उद्‍घाटन
‘रवळनाथ चषक’ स्पर्धेचे पाडलोस येथे उद्‍घाटन

‘रवळनाथ चषक’ स्पर्धेचे पाडलोस येथे उद्‍घाटन

sakal_logo
By

90442
पाडलोस ः रवळनाथ मित्रमंडळ आयोजित कार्यक्रमात बाळा परब, निहार गावडे, विश्वनाथ नाईक, नंदा गावडे, कृष्णा करमळकर आदी. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

‘रवळनाथ चषक’ स्पर्धेचे
पाडलोस येथे उद्‍घाटन
बांदा, ता. २० ः पाडलोस रवळनाथ मित्रमंडळाने सामाजिक, क्रीडा क्षेत्रात टाकलेले पाऊल कौतुकास्पद आहे. याद्वारे गावात विविध उपक्रम राबविणे सर्वांच्या सहकार्याने शक्य होईल. क्रिकेट खेळासोबत आरोग्याच्या दृष्टीने शिबिरे राबविल्यास सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळा परब यांनी दिली.
पाडलोस येथे रवळनाथ मित्रमंडळ आयोजित रवळनाथ चषक स्पर्धेच्या उद्‍घाटनावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर शिवसेना पाडलोस शाखाप्रमुख महेश कुबल, ग्रामपंचायत माजी सदस्य नंदा गावडे, पाडलोस सोसायटी व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक, संचालक राघोबा गावडे, निहार इंटरप्राईजेसचे निहार गावडे, निवृत्त मुख्याध्यापक कृष्णा करमळकर, पाडलोस माजी उपसरपंच महादेव गावडे, माजी चेअरमन सुभाष करमळकर, पोलिसपाटील रश्मी माधव, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रशांत माधव, आनंद गावडे, दिनेश चव्हाण, दशरथ पंडित, जयेश गावडे, दत्ताराम गावडे, तुकाराम गावडे आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी कोकण विभाग महिला अध्यक्ष अर्चना घारे-परब यांनीही स्पर्धेस शुभेच्छा दिल्या. मुलांनी खेळातून आपले कौशल्य दाखवत उंच पातळी गाठावी, असे आवाहन करताना भविष्यात पाडलोसच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. परब यांनी जिल्ह्यातील रक्तदान शिबिरांचे आयोजन केल्यास सर्वतोपरी सहकार्य करू, असे सांगितले. राष्ट्रवादीच्या घारे-परब यांनी सर्व खेळाडूंना टी-शर्टचे मोफत वाटप केले.
शिक्षक मोहन पालेकर व रंजन नाईक यांनी सूत्रसंचालन केले. बंटी गावडे यांनी आभार मानले.