म्हापणमध्ये आज विविध कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हापणमध्ये आज 
विविध कार्यक्रम
म्हापणमध्ये आज विविध कार्यक्रम

म्हापणमध्ये आज विविध कार्यक्रम

sakal_logo
By

म्हापणमध्ये आज
विविध कार्यक्रम
कुडाळ ः म्हापण येथील सातेरी मंदिरात उद्या (ता. २२) गुढीपाडवा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. उद्या सकाळी श्रींची पूजा, मूर्तीची स्थापना, पंचांग वाचन, धार्मिक कार्यक्रम, दादरा, सायंकाळी शांतादुर्गा मंदिराकडून पाट येथील माऊली मंदिर येथे ‘रवळा नेणे’ कार्यक्रम, इंगळे न्हाणे, रात्री पालखी सोहळा, दशावतार नाटक, म्हापण ग्रामी वसलीस आई'' या भक्तीपुष्पाचे लोकार्पण, श्री जगन्नाथ संगीत विद्यालय, आंदुर्ले कुडाळचे पखवाज अलंकार महेश सावंत यांच्या १०१ पखवाजवादक शिष्यांचे पखवाजवादन, सिद्धाई डान्स अकादमी, कुडाळच्या कविता मोहन राऊळ आणि विद्यार्थ्यांचे भरतनाट्यम, सिंधुदुर्गसह कर्नाटकातील मुरुडेश्वर येथील भाविकांना मंत्रमुग्ध केलेल्या १०१ पखवाज़वादक व नृत्य कलाकारांचा कार्यक्रम होणार आहे.
-----------------
आंबेडकर जयंतीचे
दोडामार्गात नियोजन
दोडामार्ग ः विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती कार्यक्रम नियोजनासाठी तालुक्यातील कार्यकर्त्यांची सभा नुकतीच दोडामार्ग येथील महाराजा सभागृहात झाली. या सभेत तालुकास्तरीय भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सभेत तालुकास्तरीय जयंती उत्सव समितीची स्थापना करण्यात येऊन अध्यक्षपदी भगवान जाधव, तर सचिवपदी हरिश्चंद्र मणेरीकर यांची निवड करण्यात आली. १३ एप्रिलला वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला, रांगोळी स्पर्धा, रक्तदान शिबिर, १४ ला सकाळी नऊला ध्वजवंदन, सभा, दुपारी भोजन, सायंकाळी पाचला दोडामार्ग शहरात ढोलताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. सभेत नवराज कांबळे, सुरेश जाधव, बलराम सोनावणे, लाडू पिळगावकर, हिरोजी जाधव, केशव आयनोडकर, देविदास कदम, कृष्णा महादेव आदींनी मार्गदर्शन केले.
------------------
ओझरम शाळेस
संगणक, प्रिंटर
कणकवली ः जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओझरम क्रमांक १ शाळेला ओझरम-तीर्थवाडीचे रहिवासी व मुंबई पोलिस संजय राणे यांनी संगणक संच, तर सिमेन्स ऐक्य एज्युकेशन अ‍ॅण्ड वेल्फेअर ट्रस्ट, ठाणे यांच्या माध्यमातून ट्रस्टचे अध्यक्ष अशोक राणे यांनी प्रिंटर देणगी स्वरुपात भेट दिला. याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष राणे यांनी आपल्या शाळेतील मुलांनी संगणकाचे योग्य ज्ञान घेऊन अध्ययनातील त्याचा उपयोग जाणून घ्यावा व योग्य सराव करावा, असे आवाहन केले. यावेळी उपसरपंच प्रशांत राणे, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर राणे, एकनाथ राणे, दाजी राणे, सदानंद (बाबू) राणे, सुरेश राणे, गणेश राणे, बंडू राणे, मुख्याध्यापक स्नेहल कदम, शाळेतील शिक्षक विनायक जाधव, श्रीया गोसावी, ज्योती ब्रह्मदंडे व विद्यार्थी होते.
-------------------
पिकुळेत शनिवारी
दशावतारी नाटक
दोडामार्ग ः पिकुळे-लाडाचे टेंब येथे शनिवारी (ता. २५) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ कुडाळ-नेरुर यांचा ‘स्त्री-संगम स्वरुपिणी’ हा नाट्यप्रयोग रात्री एकला होणार आहे. तत्पूर्वी सायंकाळी सहाला श्रींची महापूजा, त्यानंतर आरती व स्थानिक ग्रामस्थांची भजने होणार आहेत. या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन पिकुळेवासीयांनी केले आहे.