लांजातील कुणबी पतसंस्थेचा बॅंको ब्ल्यू रिबन पुरस्काराने गौरव

लांजातील कुणबी पतसंस्थेचा बॅंको ब्ल्यू रिबन पुरस्काराने गौरव

लांजातील कुणबी पतसंस्थेला पुरस्कार

लांजा, ता. २१ : शहरातील कुणबी विकास सहकारी पतसंस्थेला सलग पाचव्यांदा राज्यस्तरीय बँको ब्ल्यू रिबन २०२२ पुरस्काराने गौरविण्यात आले.
अविज पब्लिकेशन व गॅलेक्सी इनमा याच्यातर्फे दरवर्षी बँको ब्ल्यू रिबन पुरस्काराचे आयोजन केले जाते. सन २०२२ या वर्षासाठी बँको ब्ल्यू रिबन पुरस्कारासाठी संस्थेची आर्थिक स्थिती, व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, व्यवसाय वाढीसाठी केलेल्या नवीन योजना आदी माहितीच्या आधारे, तज्ञ निवड समितीने केलेल्या मूल्यांकनानुसार नागरी पतसंस्था ठेवी ३५ ते ५० कोटीपर्यंत या विभागामध्ये सलग पाचव्या वर्षी राज्यस्तरीय बँको ब्ल्यु रिबन पुरस्कारासाठी कुणबी विकास सहकारी पतसंस्थेची निवड झाली. महाबळेश्वर येथे ॲडव्हान्टेज २०२३ या राज्यस्तरीय सहकार परिषदेमध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पतसंस्थेला ठाणे जनता सहकारी बॅंकेचे अध्यक्ष शरद गांगल यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत परवडी, उपाध्यक्ष विलास दरडे, संचालक नंदकुमार आंबेकर व मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप डाफळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. पतसंस्थेने संपूर्ण रत्नागिरी जिल्हा कार्यक्षेत्रात वाढ करून रत्नागिरी, देवरूख व चिपळूण येथे नवीन शाखा सुरू केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com