Wed, May 31, 2023

नवेदर लोणवीवाडी-कशेळी रस्त्यासाठी निधी मंजूर
नवेदर लोणवीवाडी-कशेळी रस्त्यासाठी निधी मंजूर
Published on : 21 March 2023, 10:50 am
- rat२१p८.jpg-
९०४६०
राजापूर ः रस्त्याच्या कामाचा शुभारंभाप्रसंगी उपस्थित आमदार राजन साळवी, दीपक नागले आदी.
--
नवेदर लोणवीवाडी-कशेळी रस्त्यासाठी निधी मंजूर
राजापूर, ता. २१ ः तालुक्यातील कोंडसर बुद्रुक येथील नवेदर लोणवीवाडी कशेळी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी आमदार राजन साळवी यांच्या शिफारशीने ३० लाख ९४ हजाराचा निधी निधी मंजूर झाला आहे. या कामाचा आमदार साळवींच्या हस्ते आरंभ झाला. नवेदर लोणवीवाडी कशेळी रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामासाठी निधी मिळावा म्हणून आमदार श्री. साळवी यांनी प्रयत्न केले. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती दीपक नागले, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय साळवी, तालुकाप्रमुख कमलाकर कदम, माजी उपसभापती सुहास वारीक आदी उपस्थित होते.