राज्यस्तरीय बॅंको ब्ल्यू रिबन पुरस्कार

राज्यस्तरीय बॅंको ब्ल्यू रिबन पुरस्कार

फोटो ओळी
- rat२१p१.jpg-
९०४३१
राजापूर ः बॅको पुरस्कार स्विकारताना राजापूर तालुका कुणबी पतपेढीचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर, कर्जवसुली अधिकारी श्रीकांत राघव, लिपीक जितेंद्र मांडवे आदी.

राजापूर कुणबी पतपेढीला बॅंको ब्ल्यू रिबन पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २१ ः कोल्हापूर येथील अविज पब्लिकेशन आणि पुणे येथील गॅलेक्सी इन्मा यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणाऱ्‍या सहकार क्षेत्रातील राज्यस्तरीय बॅंको ब्ल्यू रिबन पुरस्कार राजापूर तालुका कुणबी पतपेढीने सलग पाचव्या वर्षी पटकावला. महाबळेश्‍वर येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमामध्ये बँको पुरस्काराने पतसंस्थेला नुकतेच गौरविण्यात आले.
पतसंस्थेचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर, कर्जवसुली अधिकारी श्रीकांत राघव, लिपीक जितेंद्र मांडवे यांनी हा पुरस्कार ठाणे जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरद गांगल यांच्या हस्ते स्वीकारला. संस्थेने सभासद, शेअर्स, निधी, ठेवी, कर्ज, गुंतवणुक, खेळते भागभांडवल यामध्ये केलेली वाढ, उत्कृष्ट वसुली, सीडी रेशोचे आदर्श प्रमाण, नेट एनपीए शून्य टक्के, सातत्याने संस्थेने मिळविलेला अ वर्ग, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, संस्थेची प्रभावी वसुली यंत्रणा, संस्थेचे सहकार चळवळीसाठीचे योगदान, संस्थेने जपलेली सामाजिक बांधिलकी, सभासदांना दिलेली सेवा आदी निकषांच्या आधारे राजापूर तालुका कुणबी पतसंस्थेला हा पुरस्कार देण्यात आला. पतसंस्थेचे चेअरमन श्री. मांडवकर, व्हाइस चेअरमन बाळकृष्ण तांबे आणि संचालक मंडळाने घेतलेले निर्णय आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पाटकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केलेली अंमलबजावणी यांची महत्वाची भूमिका आहे. पतसंस्थेच्या यशामध्ये पदाधिकाऱ्यांसह संचालक मंडळ, सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक, कर्मचारीवृंद, पिग्मी, आरडी एजंट, स्थानिक कमिटी सदस्य, कर्जवसुली अधिकारी श्रीकांत राघव, सीए श्री. पाटणकर, कायदेशीर सल्लागार एस. एम. देसाई आदींचे योगदान असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पाटणकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com