
ताम्हाणेतील विकासकामांसाठी सव्वा कोटी निधी
-rat२१p१०.jpg-
९०४६६
राजापूर ः टाकीच्या बांधकामाची पाहणी करून ग्रामस्थांशी चर्चा करताना आमदार राजन साळवी.
--
ताम्हाणेतील विकासकामांसाठी सव्वा कोटीचा निधी
राजापूर, ता. २१ ः शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि आमदार राजन साळवी यांच्या माध्यमातून तालुक्यातील ताम्हाणे गावातील रस्ता, नळपाणीपुरवठा योजना आणि हायस्कूल येथे सभागृह बांधणे आदी विकासकामांसाठी विविध योजनांमधून सुमारे १ कोटी २५ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यातून ताम्हाणे गावच्या विकासाला चालना मिळणार आहे.
या विकास कामांचे भूमिपूजन आमदार साळवी यांच्या हस्ते झाले. या वेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख कमलाकर कदम, महिला उपजिल्हा संघटिका दूर्वा तावडे, तालुका युवाधिकारी संदेश मिठारी आदी उपस्थित होते. जलजीवन मिशन अंतर्गत सौंदळकरवाडी येथे नळपाणी पुरवठा योजना करण्यासाठी ७७ लाख, बोल्ये दुकान ते पहिली वाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी ३८ लाख, ताम्हाणे हायस्कूल येथे हॉल बांधणे या कामासाठी १० लाख आदी कामांचा समावेश आहे.