वर्धापन दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वर्धापन दिन
वर्धापन दिन

वर्धापन दिन

sakal_logo
By

(टुडे पान २ साठी, संक्षिप्त)

कोमसापच्या वर्धापन दिनात
अभिवाचन आणि कवितावाचन उपक्रम

रत्नागिरी ः कोकणामध्ये मागील अनेक वर्षे सातत्याने मराठी भाषा आणि मराठी साहित्य विकास चळवळ प्रवाहित करण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद ही संस्था अग्रेसर राहिली आहे. याच कोकण मराठी साहित्य परिषदेचा वर्धापन दिन शुक्रवारी (ता. २४) दुपारी दोन वाजता कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे होणार आहे. यावर्षीच्या वर्धापन दिनात अभिवाचन आणि कवी केशवसुत यांच्या समकालीन कवींच्या कवितांचे वाचन असे दोन उपक्रम घेण्यात येणार आहेत. हे दोन्ही उपक्रम खुल्या स्वरूपात असून मराठी भाषा आणि मराठी साहित्य यामध्ये आवड असणारे सर्वच जण सहभाग घेऊ शकतात. यासाठी इच्छुकानी आपली नावे वैभव पवार, अमेय धोपटकर, अरुण मोर्ये यांच्याकडे नोंदवावी अथवा संपर्क करावा. तसेच कोमसापचा वर्धापन दिन उत्साहात व्हावा म्हणून कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंड आणि कवी केशवसुत स्मारक मालगुंडचे सर्वच सदस्य मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेने नियोजित केलेल्या दोन्ही उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पाटील आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखा अध्यक्षा नलिनी खेर यांनी केले आहे.
-
मसिहा फाउंडेशनचे आरोग्य शिबिर

रत्नागिरी ः मसिहा फाउंडेशन रत्नागिरीतर्फे शहरातील मिस्त्री हायस्कूल येथे मोफत आरोग्य तपासणी व डोळे तपासणी शिबिर उत्साहात झाले. रमजान सण सुरू होत आहे आणि या निमित्ताने प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठीच या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मसिहा फाउंडेशनचे संस्थापक जकी खान यांनी सांगितले. शिबिरात २४७ नागरिकांनी विविध आजारांची तपासणी केली. नागरिकांना त्यांच्या आजारासंबंधी लागणारी औषधे मोफत पुरवण्यात आली. तसेच पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तालिमी इम्दादिया कमिटी मुंबई, रत्नागिरी शाखा यांनी व मिस्त्री हायस्कूलने शिबिरासाठी मोलाची मदत केली. या वेळी फाउंडेशनचे अध्यक्ष तसव्वर खान, उपाध्यक्ष राशीद काझी, सचिव मन्सूर शेख, खजिनदार तौहीद भाटकर, संस्थापक जकी खान उपस्थित होते.
-