सुषमा स्वराज पुरस्काराने महिलांना सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुषमा स्वराज पुरस्काराने महिलांना सन्मान
सुषमा स्वराज पुरस्काराने महिलांना सन्मान

सुषमा स्वराज पुरस्काराने महिलांना सन्मान

sakal_logo
By

- rat२१p१२.jpg ः
९०४७९
राजापूर ः माजी नगरसेविका शीलाताई शेट्ये यांचा गौरव करताना महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष श्रुती ताम्हणकर. या वेळी जिल्हा सरचिटणीस शिल्पा मराठे, शीतल रहाटे, रसिका कुशे, अनुजा पवार, सुयोगा जठार आदी.
-
सुषमा स्वराज पुरस्काराने महिलांचा सन्मान

राजापूर भाजपतर्फे उपक्रम ः लक्षवेधी कामगिरी करणारीची दखल

राजापूर, ता. २१ ः विविध क्षेत्रात उल्लेखनीय आणि लक्षवेधी कामगिरी करणाऱ्‍या शहर आणि तालुक्यातील महिलांना भाजपच्या तालुका महिला मोर्चातर्फे स्व. सुषमा स्वराज अ‍ॅवॉर्ड देऊन गौरवण्यात आले. यामध्ये समाजसेविका, डॉक्टर, परिचारिका, वकील, शिक्षिका, उद्योजिका, कला आदी विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांचा समावेश आहे.
संसाराचा रहाटगाडा ओढताना आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये स्वकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्‍या समाजामध्ये अनेक महिला आहेत. त्याचवेळी मोलमजुरी करून पुरुषांच्या जोडीने यशस्वीपणे संसार उभा करणाऱ्या महिलाही समाजामध्ये दिसतात. अशा कर्तृत्वान महिलांचा भाजपच्या तालुका महिला मोर्चातर्फे गौरवण्यात आला. या महिलांना स्व. सुषमा स्वराज अ‍ॅवॉर्ड देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. या वेळी तायक्वांदो क्रीडाक्षेत्रांमध्ये राष्ट्रीय अन् राज्यस्तरीय स्पर्घांमध्ये सुयश मिळवलेल्या खेळाडूंसह भाजपच्या माजी नगरसेविका शीलाताई शेट्ये यांचाही या वेळी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस शिल्पा मराठे, तालुकाध्यक्ष श्रुती ताम्हणकर, उपाध्यक्षा शितल रहाटे, जिल्हा सदस्य रसिका कुशे, तालुका सरचिटणीस अनुजा पवार, तालुका कोषाध्यक्ष सुयोगा जठार, ओबीसी महिला तालुकाध्यक्ष अनिता पांचाळ, ओबीसी महिला तालुका सरचिटणीस रेणुका गुंड्ये, अरुणा शेवडे, शहर महिलाध्यक्ष सोनल केळकर, सांस्कृतिक सेलच्या जान्हवी परांजपे, ज्योती खटावकर आदी पदाधिकारी उपस्थित होत्या.