मळेवाड, आजगावात रक्तदान शिबिरास प्रतिसाद

मळेवाड, आजगावात रक्तदान शिबिरास प्रतिसाद

90482
आजगाव ः येथे रक्तदात्यांचे स्वागत करताना पदाधिकारी, ग्रामस्थ.

मळेवाड, आजगावात रक्तदान शिबिरास प्रतिसाद

‘सिंधू रक्तमित्र’चा पुढाकार; युवकांसह महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

सावंतवाडी, ता. २१ ः सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्गच्या सावंतवाडी शाखेने शिवप्रेमी ग्रुप, आजगाव-धाकोरे आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, मळेवाड या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आणि अनुक्रमे सावंतवाडी रक्तपेढी व एसएसपीएम रक्तपेढी, पडवे यांच्या सहकार्याने तालुक्यातील आजगाव व मळेवाड येथे एकाच दिवशी आयोजित केलेल्या दोन रक्तदान शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. छत्रपती शिवराय व धर्मवीर शंभुराजे यांच्या विचारांनी, ध्येयाने व धैर्याने प्रेरित होऊन बहुसंख्य युवकांनी आणि महिलांनीही रक्तदान केले.
आजगाव येथील शिबिराचे उद्‍घाटन उपसरपंच सुशील कामटेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी सरपंच सुप्रिया मेस्त्री, भोमवाडी सरपंच अनुराधा वराडकर, तिरोडा सरपंच प्रियांका सावंत, पोलिस पाटील निकिता पोखरे, शिक्षक अनिल गोवेकर, वासुदेव सावंत, विठ्ठल केदार, संजय वाडकर, सावंतवाडी रक्तपेढीचे डॉ. लादे, अनिल खाडे, प्राजक्ता रेडकर, मानसी बागेवाडी, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे सावंतवाडी खजिनदार सिद्धार्थ पराडकर, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे नियमित रक्तदाते सदस्य पुरुषोत्तम शेणई आदी उपस्थित होते. आठ दिवसांपूर्वीच गोवा-बांबोळी येथे अत्यवस्थ रुग्णासाठी आठ रक्तदात्यांची गरज असताना राजू शेणई यांनी आठ रक्तदात्यांना बांबोळी येथे नेऊन रुक्तदान केले होते. याबद्दल शिवप्रेमी ग्रुपतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. शिबिर यशस्वी होण्यासाठी शिवप्रेमी बाळकृष्ण हळदणकर, प्रसाद मेस्त्री, अनंत पांढरे, प्रतीक भगत, रामा रेवाडकर, प्रमोद पांढरे, गुरू गवंडे, सुभाष पांढरे, जे. के. पांढरे आदींनी मेहनत घेतली.
मळेवाड येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, मळेवाडच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या शिबिराचे उद्‍घाटन प्राथमिक आरोग्य केंद्र मळेवाडच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैष्णवी जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर एसएसपीएम रक्तपेढीचे डॉ. वानखेडे, लॅब टेक्निशियन मनीष यादव, पंच सदस्य अर्जुन मुळीक, महेश शिरसाट, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळा शिरसाट, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, मळेवाड सचिव श्रीकांत नाईक, गोपाळ रेडकर, रमाकांत नाईक, नंदू नाईक, राजन परब, तात्या परब, मंगेश पाटील, अभिषेक रेगे, पत्रकार मदन मुरकर, परिचारिका जोत्स्ना नवार आदी उपस्थित होते. रक्तदान शिबिरासाठी आत्माराम नाईक, मितेश नाईक, सुमित नाईक, सर्वेश नाईक, नामदेव नाईक, संजय शिरोडकर, स्वदेश नाईक, शेखर काळोजी तसेच विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. नंदू नाईक यांनी सूत्रसंचालन केले. सचिव श्रीकांत नाईक यांनी आभार मानले. दोन्ही रक्तपेढ्यांशी समन्वय साधून सिंधू रक्तमित्रचे सावंतवाडी तालुका सचिव बाबली गवंडे यांनी योग्य नियोजन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com