विकास साखळकरना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विकास साखळकरना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार
विकास साखळकरना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार

विकास साखळकरना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार

sakal_logo
By

- rat२१p१८.jpg-
90498
पुणे ः राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार स्वीकारताना विकास साखळकर व कुटुंबीय.
-
विकास साखळकरांना समाजभूषण पुरस्कार

रत्नागिरी, ता. २१ ः रक्ताची तातडीची गरज असताना संबधित रूग्णासाठी धावून जाणारे आणि विविध समाजकार्यात हिरिहिरीने सहभाग घेणाऱ्या रत्नागिरीतील विकास साखळकर यांना पुणे इंदापूर येथील क्रांतीसुर्य सामाजिक संघटनेने समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव केला. समाजाबद्दल काहीतरी करावे याबद्दलची धडपड असणारे व्यक्तीमत्व म्हणून विकास साखळकर यांची ओळख आहे. साखळकर यांनी प्रामुख्याने रक्तदान, गरीब गरजूंना मोफत रक्तदान कार्ड उपलब्ध करून देणे, रक्तसाठा उपलब्ध नसल्यास रक्तदाते उपलब्ध करून देणे आणि रुग्णाची गरज भागवणे, याचबरोबर गोरगरीब जनतेला कपडे, चटई, ब्लॅंकेट, स्वेटर वाटणे, तसेच साखळकर हे स्वतः गाडी चालक असल्याने चालकांच्या न्याय हक्कासाठी लढणे, चालकांच्या अडीअडचणी सोडविणे अशी विविध प्रकारची समाजोपयोगी कामे केली आहेत. त्यांनी स्वतः ४३ वेळा रक्तदान केले. त्यापैकी ३७ वेळा तातडीची आवश्यकता असताना त्यांनी रक्तदान केले. त्यामूळे रूग्णाना जीवनदान मिळाले. त्यांच्या या कामाची दखल क्रांतीसुर्य सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब सावंत आणि त्यांच्या संघटनेने घेतली. पुणे इंदापूर येथे क्रांतीसुर्य सामाजिक संघटनेच्या झालेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात २०२२-२३ या वर्षाचा क्रांतीसुर्य समाजभूषण पुरस्कार साखळकर यांना प्रदान करण्यात आले. निर्माते बाबा गायकवाड आणि संपादक चांद भैया शेख यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले.