राजापूर-तीनशे ग्रामपंचायतींमध्ये बसणार स्वयंचलित हवामान केंद्र

राजापूर-तीनशे ग्रामपंचायतींमध्ये बसणार स्वयंचलित हवामान केंद्र

फोटो ओळी
- rat२१p१५.jpg- KOP२३L९०४८५ राजापूर ः स्वयंचलित हवामान केंद्र.
---------

तीनशे ग्रामपंचायतींमध्ये बसविणार स्वयंचलित हवामान केंद्र
हवामान बदलांचा अभ्यासासाठी उपयुक्त ; विमा कंपन्यांना ठरणार फायदेशीर
राजापूर, ता. २१ ः हवामानातील बदलाच्या नोंदी टिपण्यासाठी आता ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यामध्ये सुमारे तीनशे ग्रामपंचायतींमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्यात येणार आहेत. हवामानातील या बदलांचा कृषी विषयक अभ्यास करण्यासाठी आणि संभाव्य आपत्तीला सामोरे जाण्याच्याच्यादृष्टीने नोंदी ठेवण्यासाठी ही स्वयंचलित हवामान केंद्र उपयुक्त ठरणार आहेत. त्याचवेळी विविध योजनांतर्गंत शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळणेही अधिक सुलभ होणार आहे.
ग्रामपंचायतींमध्ये उभारण्यात येणारी स्वयंचलित हवामान केंद्र उभारणीसाठी विविध निकषान्वये जागांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार निवड झालेल्या राजापूर तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींपैकी १९ ग्रामपंचायतींचे स्वयंचलित हवामान केंद्र उभारणीसाठी परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुहास पंडित यांनी दिली.
महसूल मंडल स्तरावर बसविण्यात आलेली पर्जन्यमापक यंत्र वा स्वयंचलीत हवामान केंद्राच्या माध्यमातून हवामानातील विविधांगी बदलांच्या नोंदी सद्यस्थितीमध्ये होत आहेत. मात्र या केंद्राची संख्या मर्यादित असल्याने त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार आता ग्रामपंचायत स्तरावर ही हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे. फळपिक विमा असो वा पीक विमा योजना असो नुकसान भरपाई देतेवेळी विमा कंपन्या अनेकवेळा स्कायमेटकडून त्या-त्यावेळच्या हवामान बदलाची माहिती घेतात.
आता राज्य सरकारच्या नव्या धोरणामुळे ग्रामपंचायतस्तरावर उभारण्यात येणार्‍या स्वयंचलीत हवामान केंद्रांमुळे सर्व माहिती लागलीच एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसह विमा कंपन्यांना नुकसानीची अचूक माहिती उपलब्ध होणार आहे. ज्यामुळे शेतकर्‍यांना जास्तीत जास्त मदतीची रक्कम मिळण्यास मदत होणार आहे.


चौकट
स्वयंचलित हवामान केंद्राचा उपयोग
शासनातर्फे पीकविमा योजना, हवामानावर आधारित फळपीक विमा योजना यांसारख्या योजना राबविल्या जात आहेत. या योजनांसह कृषी हवामान सल्ला व मार्गदर्शन, कृषी संशोधन कार्य, आपत्ती व्यवस्थापन कार्य आदींसाठी पर्जन्यमान, तापमान, सापेक्ष आर्द्रता, वार्‍याची दिशा, वार्‍याचा वेग आदी हवामानविषयक माहिती मिळणे आवश्यकत ठरते. ही माहिती मिळण्यासाठी स्वयंचलीत हवामान केंद्र महत्वपूर्ण ठरते.

चौकट
केंद्रासाठी प्रस्ताव असलेली राजापूरची गावे
अणसुरे, ओशिवळे, साखरीनाटे, उन्हाळे, ताम्हाणे, पांगरे बुद्रुक (शेंबवणे), आंबोळगड, देवीहसोळ, तळगाव, पाचल, पेंडखळे, जुवाठी, तुळसवडे, कोळवणखडी, करक, ओणी, कळसवली, कारवली, ओझर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com